शहरं
Join us  
Trending Stories
1
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
2
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
3
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
4
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
5
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
6
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
7
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
8
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
9
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
10
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
11
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
12
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
13
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
14
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
15
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
16
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
17
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
18
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
19
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
20
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'

पर्यटन माहिती केंद्र सुरू करणार

By admin | Published: August 18, 2015 11:48 PM

हॉटेल मालक संघाची तयारी : महापालिकेकडे मागितली जागा, पर्यटकांची गैरसोय होणार दूर

कोल्हापूर : राज्याच्या कानाकोपऱ्यांतून जेव्हा पर्यटक कोल्हापुरात येतात तेव्हा त्यांना जायचं कु ठं, राहायचं कु ठं, कोल्हापुरात काय-काय पाहायचं, असे अनेक प्रश्न पडतात. त्यांना हमखास माहिती मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होते. पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन कोल्हापूर हॉटेल मालक संघाने ‘पर्यटन माहिती केंद्र’ सुरू करण्याची तयारी दाखविली असून त्यासाठी रेल्वे स्थानक व मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जागा मागितली आहे. कोल्हापूर शहरात पूर्वी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे एक पर्यटन माहिती केंद्र मध्यवर्ती बसस्थानकावर कार्यरत होते; परंतु हे कार्यालय पुणे येथे हलविण्यात आले. त्यानंतर अधिकृत अशी माहिती देणारे केंद्र सध्या कोल्हापुरात नाही. त्यामुळे जेव्हा पर्यटक कोल्हापुरात पाय ठेवतो, त्यावेळी त्याच्यासमोर वेळ आणि पैसे याच्या ताळमेळ घालून शहरात काय-काय पाहावे, कुठे आणि कोणत्या हॉटेलमध्ये राहावे, यात्री निवास कुठे आहेत, भोजनाची व्यवस्था कुठे चांगली होऊ शकते याबाबतची कसलीच माहिती मिळत नाही. अशावेळी रिक्षाचालक त्यांना घेऊन तोडकी-मोडकी माहिती देतात. रिक्षाचालकांचा भाड्यापुरता संबंध असल्याने त्यांच्याकडून पक्की व खात्रीशीर माहिती मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होते. पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन कोल्हापूर हॉटेल मालक संघाने त्यात पुढाकार घेतला असला तरी संघासमोरही जागेचा प्रश्न आहे. त्यासाठी संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, सचिव शशिकांत माळकर, आनंद माने, अरुण चोपदार आदींनी महापौर वैशाली डकरे यांची भेट घेऊन पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्याबाबतचा विचार बोलून दाखविला. मध्यवर्ती बसस्थानक किंवा रेल्वे स्थानक परिसरात दहा बाय दहा स्केअर फुटाची जरी जागा उपलब्ध करून दिली गेली तर असे केंद्र सुरू करता येणे शक्य असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर डकरे यांना पटवून दिले. महापौरांनीही याकामी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. (प्रतिनिधी)पर्यटन माहिती केंद्र सुरू झाल्यास बाहेरगावच्या पर्यटकांना योग्य मार्गदर्शन होईल. त्यांचा वेळ वाचेल आणि त्यांच्या बजेटप्रमाणे सर्व नियोजन करणे शक्य होईल. ‘कोल्हापूर दर्शन’साठी के.एम.टी. बस सुरू केली तर शहरातील सर्व हॉटेल्सवर त्याच्या बुकिंगची सोयही उपलब्ध केली जाईल. - आनंद मानेमनपा सभेत जागेचा ठराव होणारगुरुवारी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी सदस्य ठरावाद्वारे ही अशी जागा देण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्यासाठी मनपाने जागा दिली की हॉटेल मालक संघ तेथे आपला कर्मचारी ठेवून पर्यटकांना माहिती देईल.