शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

पर्यटनाला फटका! पर्यटकांना कोरोनाची धास्ती, बुकिंग रद्द करण्यासाठी घाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 11:54 AM

गेल्या दोन वर्षांतील कोरोनाकाळातील स्थिती लक्षात घेऊन ते पर्यटनासाठी केले बुकिंग रद्द

कोल्हापूर : जगातील विविध देशांमध्ये कोल्हापुरातून पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे विमान प्रवास, परदेशातील हॉटेलमध्ये केलेले ॲडव्हॉन्स बुकिंग (आगाऊ नोंदणी) रद्द करण्यासाठी त्यांची घाई सुरू आहे. मात्र, आपल्या देशातील बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमावलीवर विश्वास ठेवून त्याचे पालन योग्य पद्धतीने करून बिनधास्त पर्यटनाचा आनंद घ्या, असे आवाहन कोल्हापुरातील ट्रॅव्हल्स एजंटांनी केले आहे.कोल्हापुरातून दरवर्षी दुबई, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, अमेरिका, लंडन आदी देशांमध्ये सुमारे ७ हजार लाेक पर्यटनासाठी जातात. त्यातील काहीजण नातेवाइकांना भेटण्यासाठी लंडन, अमेरिकेला जातात. पर्यटनाला जाण्यासाठी नोव्हेंबरपासून नागरिक बुकिंग करतात. नववर्षातील पर्यटनासाठी आतापर्यंत सुमारे ११०० जणांनी बुकिंग केले आहे; पण गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून जगभरातील कोरोना प्रादुर्भावाची येणाऱ्या माहितीमुळे पर्यटकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील कोरोनाकाळातील स्थिती लक्षात घेऊन ते पर्यटनासाठी केलेले बुकिंग रद्द करण्यासाठी ट्रॅव्हल्स एजंटांशी प्रत्यक्षात, दूरध्वनीवरून घाई करत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक झाली. पर्यटकांनी कोरोनाची धास्ती टाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये. पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी केले.देश-विदेशातील सर्व सहली फुल्ल आहेत. देशातील काश्मीर, राजस्थान, केरळकडे पर्यटकांचा ओढा आहे. गेली दोन वर्षे युरोपमधील पर्यटन खुले झाले आहे. तिकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनविषयक असलेली संपूर्ण नियमावली पर्यटकांना सांगितली जाईल. ‘आरटी-पीसीआर’ चाचणी पर्यटनाहून आल्यानंतर केली जाईल. एअर लाइन्सकडून वेळोवेळी मिळालेल्या सूचना, माहिती पर्यटकांना देण्यात येतील, असे वराडे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष रवि पोतदार, सचिव अमित चौकले, उमेश पवार, संचालक विनोद कांबोज उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याtourismपर्यटन