: शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन आणि कोरोना लसीकरणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यात आलेले यश, या प्रमुख कारणांमुळे कसबा बीड (ता. करवीर) गाव कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती सरपंच सर्जेराव तिबिले, उपसरपंच वैशाली सूर्यवंशी यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कसबा बीड गावात ४९ कोरोनाचे रुग्ण सापडले होते, त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने दक्षता समिती, कोरोना योद्धे व ग्रामस्थांच्या सहकार्याने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत दि. २१ जूनअखेर रुग्णसंख्या शून्यावर आणली आहे. मोठे पेठ गाव असूनही सांघिक प्रयत्नांमुळे गावाने कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळवले आहे.
कसबा बीड गावची जादा लोकसंख्या असून, गाव शासकीय प्रशासन, पोलीस विभाग ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कोरोनामुक्त करण्यात विशेष कार्य करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सत्यजित पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शामराव सूर्यवंशी, पोलीस पाटील पंढरीनाथ ताशिलदार, ग्रामसेवक संदीप पाटील, दिनकर सूर्यवंशी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.