कोल्हापूर : विकेंड लॉकडाऊन बाबतच्या राज्य सरकारच्या आदेशाचा सध्या, तरी अर्थ आठवड्यातले दोन दिवस लॉकडाऊन असाच अर्थ होत आहे. त्यामुळे आज, मंगळवारी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यापार व्यवसाय चालू राहतील. संबंधी उद्या जो काही खुलासा येईल, त्याची माहिती सर्व दिली जाईल. त्यानुसार पुढील निर्णय एकत्रितपणे घेऊ, असे आवाहन या असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सोमवारी व्यापारी, व्यावसायिकांना केले.
शनिवारी, रविवारी लॉकडाऊन राहील असे जाहीर केले आहे. (यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. उद्योगांना परवानगी दिली आहे.) मात्र, व्यापार, व्यवसाय कोरोनासंबंधीच्या निकषांचे पालन करून चालू ठेवणे अपेक्षित आहे. शासनाच्या आज आलेल्या आदेशाचा सर्वसाधारण अर्थ असाच होतो. परंतु राज्यभर याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अन्य सर्व संस्थांनी सुद्धा याबाबत सरकारला आपला विरोध दर्शवला आहे. आठवड्यातील दोन दिवस लॉकडाऊन संमती दिली आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजने देखील अशीच भूमिका घेतली आहे. या सर्व संस्थांनी राज्य शासनाने याविषयी स्पष्टता करण्याची मागणी असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.