सरवडे :राधानगरी ,भुदरगड आणि कागल तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या मुदाळतिट्टा येथे सायंकाळी चार ते साडेसहा वाजेपर्यंत वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या ट्राँफिकमध्ये आमदार प्रकाश आबीटकर यांची गाडी अडकली त्यांनाही आज ट्राँफीक जामचा त्रास सहन करावा लागला .मात्र नागरिकांचे हाल ,मनस्ताप पाहून ते रस्त्यावर उतरले आणि वाहनांना मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केला. अखेर अधिक पोलिस ट्राँफीकच्या ठिकाणी आले आणि त्यांनी शर्यतीने वाहतूक कोंडी फोडून वाहने मार्गावर आणली.आज अमवास्येमुळे भाविकांची आदमापूरात बाळूमामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
कोल्हापूर-गारगोटी व राधानगरी-निपाणी या मार्गावर असलेल्या मुदाळतिट्ट्यावरुन हजारो भाविक बाळूमामाच्या दर्शनासाठी जातात.आज कोकण, कर्नाटक व राज्यातील हजारो भाविक स्वतः च्या, खाजगी तसेच बसने दर्शनासाठी आले होते. मुदाळतिट्टा येथील चौकात असलेली अतिक्रमणे आणि रस्ताचे कामही सुरु आहे. काँक्रीट रस्ता केला मात्र बाजू पट्ट्या व गटरची कामे सुरु आहेत. ते काम संथ गतीने असल्याने वारंवार ट्राँफीक जाम होते. याचा फटका हजारो वाहनधारकांना ,भाविक व नागरिकांना सहन करावा लागतो.यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा अशी मागणी प्रवाशी व वाहनचालकांच्यातून होत आहे.
उद्या दोन्ही पोलिस निरीक्षक व खात्यांच्या अधिकारी याची बैठक -मुदाळतिट्टा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आजच दोन्ही तालुक्यातील पोलिस निरीक्षक व खात्याचे अधिकारी यांची तात्काळ बैठक घेऊन बाजूची अतिक्रमणे काढण्यासाठी कार्यवाही त्याचबरोबर उड्डाणपूल होणे काळाची गरज आहे. त्यासाठी तात्काळ कार्यवाही सुरु करावी यासाठी संबंधीना सुचना देऊन लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार.आमदार - प्रकाश आबीटकर