शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

मोकाट जनावरांचा शहरातील वाहतुकीला ताप, वाहनांच्या धडकेत जनावरे जखमी होण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:40 PM

कोल्हापूर : पावसामुळे तुंबलेले रस्ते आणि खड्ड्यांमुळे शहरातील वाहतुकीचा आधीच बोजवारा उडाला आहे. त्यात आता मोकाट जनावरांचीही भर पडल्याने ...

ठळक मुद्देमोकाट जनावरांचा शहरातील वाहतुकीला ताप, वाहनांच्या धडकेत जखमी होण्याचे प्रमाण वाढले

कोल्हापूर : पावसामुळे तुंबलेले रस्ते आणि खड्ड्यांमुळे शहरातील वाहतुकीचा आधीच बोजवारा उडाला आहे. त्यात आता मोकाट जनावरांचीही भर पडल्याने वाहनधारकांच्या त्रासात वाढच झाली आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या या जनावरांना वाहनांची धडक बसून जनावरे जखमी होण्याचेही प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या अग्निशमन आणि पांजरपोळ या संस्थांवर या जखमी जनावरांना उपचार करीत फिरण्याची वेळ आली आहे. अपघातामुळे या जनावरांसह वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.शहरात प्रचंड कोसळलेल्या पावसामुळे खड्डे पडून रस्त्यांची तर चाळण झाली आहेच; शिवाय गटारी तुंबल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप येत आहे. यातून मार्ग काढण्याची वाहनधारकांना रोजच कसरत करावी लागत आहे. त्यात आता मोकाट जनावरांनी भर टाकली आहे. शहरात सायबर, राजारामपुरी, प्रतिभानगर, उद्यमनगर, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, महाराणा प्रताप चौक, गंगावेश, जामदार क्लब, मिरजकर तिकटी, जिल्हाधिकारी कार्यालय, सदर बाजार या ठिकाणी तर रस्त्यावरच या मोकाट जनावरांचा ठिय्या ठरलेला आहे. वाहनधारकांनी कितीही हॉर्न वाजवले, हाकलले तरी ही जनावरे रस्त्यावरील आपला ठिय्या सोडत नाहीत. यांना चुकविण्याच्या नादात वाहनधारकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होण्याचेही प्रकार घडले आहेत.आता तर पावसात अंधुक प्रकाशामुळे रस्त्यांवर बसलेली जनावरे वाहनधारकांना दिसत नाहीत. त्यामुळे या जनावरांना धडक देऊन पळ काढणाऱ्या वाहनधारकांचीही संख्या वाढत आहे. अशा प्रकारे जखमी झालेल्या जनावरांना पांजरपोळमध्ये उपचारासाठी आणण्याचे प्रमाण वाढले आहे. आधीच पांजरपोळमध्ये असणाऱ्या अपुऱ्या यंत्रणेवर हा ऐनवेळी आलेल्या उपचारांचा मोठा ताण येत आहे.ही मोकाट जनावरे बहुधा काहीजणांच्या मालकीची असतात. त्यांना पकडून आणले की, मालक लगेच पांजरपोळमध्ये धाव घेतात. जनावरे परत सोडून देण्यासाठी दबाव आणतात. उपचारांचा खर्च देण्यास मात्र टाळाटाळ करताना दिसतात.

वाहनधारक आणि जनावरे दोघांचाही जीव महत्त्वाचा आहे. महानगरपालिका, पांजरपोळ संस्था आणि दानशूर व्यक्तींनी यावर एकत्रितपणे मार्ग काढण्याची गरज आहे. महापालिकेने नोटीस काढून जनावरे जप्त करण्याची मोहीम सुरू केल्यास यातून काही प्रमाणात मार्ग निघू शकतो.- डॉ. राजकुमार बागल, पांजरपोळ संस्था

लिशा हॉटेलनजीक जखमी वासराला जीवदानलिशा हॉटेल चौकात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वासराला एका चारचाकी वाहनाने धडक दिली. वाहनधारक निघून गेला; पण ते वासरू जखमी अवस्थेत रस्त्यावर पावसात पडून राहिल्याने नागरिकांनी कावळा नाका येथील अग्निशमन दलास पाचारण केले. या दलाने पांजरपोळला फोन केला. डॉ. राजकुमार बागल यांनी तेथे येऊन वासराला टेम्पोतून पांजरपोळमध्ये आणले. त्याला तपासले असता त्याच्या मांडीला जखम झाल्याचे आणि पाठीला मुकामार लागल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी (दि. १२) दिवसभर त्या वासरावर उपचार सुरू होते. पांजरपोळ व अग्निशमनच्या जवानांमुळे या वासराला जीवदान मिळाले; पण रोजच असे अपघात घडत असल्याने मोकाट फिरणाºया जनावरांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.

 

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर