शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

कोल्हापूर शहरात ट्राफिक ड्राईव्ह, वाहनचालकांची तारांबळ : तीन दिवस चालणार कारवाईसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 2:45 PM

कोल्हापूर शहरात घरफोड्या, चेन स्नॅचिंग, लूटमारीसह मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. प्रत्येक चालकाची ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली गेली. या मोहिमेमध्ये वाहनचालकांवर कारवाई करीत हजार रुपये दंडाची वसुली केली. सोमवार ते बुधवार अशी तीन दिवस कारवाईसत्र चालणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात ट्राफिक ड्राईव्हवाहनचालकांची तारांबळ तीन दिवस चालणार कारवाईसत्र

कोल्हापूर : शहरात घरफोड्या, चेन स्नॅचिंग, लूटमारीसह मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी नऊ ते दूपारी एक व सायंकाळी सहा ते रात्री आठ वेळेत शहरातील चौकांत, नाक्यांवर व महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून वाहनांच्या तपासणीबरोबरच चालक मद्यप्राशन करून गाडी चालवितात काय, हे तपासण्यासाठी प्रत्येक चालकाची ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली गेली. या मोहिमेमध्ये वाहनचालकांवर कारवाई करीत हजार रुपये दंडाची वसुली केली. सोमवार ते बुधवार अशी तीन दिवस कारवाईसत्र चालणार आहे.घरफोड्या, चेन स्नॅचिंग, लूटमारीसह दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आम्ही सुरक्षित नसल्याच्या काही तोंडी तक्रारी नागरिकांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचेकडे केल्या. त्यांनी पुन्हा ट्रॅफीक ड्राईव्ह’ घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना दिले. त्यानुसार शहरातील पाच पोलीस निरीक्षक, १०० पोलीस कर्मचाऱ्यांची फौज सोमवारी रस्त्यावर उतरली.

सकाळी नऊ ते दूपारी एक व सायंकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत शिवाजी पुल, दसरा चौक, लिशा हॉटेल चौक, सदर बझार, ताराराणी पुतळा, महावीर कॉलेज चौक, मध्यवर्ती बसस्थानक, सायबर चौक, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, गंगावेश, सायबर चौक, जवाहरनगर, फुलेवाडी नाका, कळंबा नाका, वाशी नाका, आर. के. नगर आदी पंधरा ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवत प्रत्येक व्यक्तीची, वाहनांची व साहित्याची कसून तपासणी केली.

वाहनांतील गॅस किटच्या तपासणीसह परवाना, वाहनांची कागदपत्रे,तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयांची ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली. झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट,‘दादा’,‘मामा’, ‘आई’, ‘राम’, ‘पाटील’, ‘बॉस’ यासह अन्य फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून बिनदिक्कतपणे वावरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.

मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी पोलीस अधीक्षक मोहिते रस्त्यांवर उतरले होते. चौकात राज्य राखीव दलाचे जवान हातांमध्ये बंदुका घेऊन उभे असल्याचे पाहून वाहनधारकांनी धास्तीच घेतली.

कुणीही पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्याचे धाडस केले नाही. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, अशोक धुमाळ, संजय मोरे, अनिल गुजर, सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी स्वत: रस्त्यांवर उभे राहून वाहनांची तपासणी केली. ही कारवाई तीन दिवसा चालणार आहे.सीटबेल्ट व हेल्मेटचे प्रबोधनवाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. अनेकांना शारीरिक अपंगत्व आले आहे. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी वेळोवेळी पोलीस दलाच्यावतीने प्रबोधन केले जात आहे.

दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्याने होणाऱ्या अपघातांमध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनधारकांना सीटबेल्ट व हेल्मेटची सक्तीच्या सुचना पोलीसांनी यावेळी दिल्या.

वाहनचालकांनी वाहन चालविताना विहित नमुन्यातील मापदंडांप्रमाणे वाहनांची नंबरप्लेट बसवावी. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, सोबत योग्य ती कागदपत्रे बाळगावीत व कायदेशीर कारवाई टाळावी.अशोक धुमाळ,पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर