त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविल्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत शहरातील प्रमुख चौकात वाहतूक कोंडीचे चित्र होते. पंचगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका तिला जोडणाऱ्या
जयंती नाल्यालाही बसला आहे. पाण्याचा फुगवटा झाल्यामुळे पूररेषेतील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी कुंभार गल्ली, व्हीनस कॉर्नर, सुतारमळा, बापट कॅम्प, जाधववाडी, कदमवाडी, नागाळा पार्क, जिल्हाधिकारी
कार्यालयासमोरील भाग आदी भागात पुराचे पाणी शिरले. हा परिसर सकाळपासूनच पूरमय झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली. त्यामुळे शहरातील माळकर तिकटी, पापाची तिकटी, गंगावेश, कोळेकर तिकटी, पार्वती टॉकीज चौक, उमा टॉकीज चौक, बागल चौक, जनता बझार चौक, ताराराणी चौक ते रेल्वे उड्डाणपूल आदी परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे
सर्वत्र वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यात शहर वाहतूक शाखेला मोठे परिश्रम घ्यावे लागले. काही तासांच्या प्रयत्नानंतर शहरासह सर्वत्र काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली.
पोलिसांची डोकेदुखी वाढली
पूर पाहण्यासाठी बाहरे पडलेल्या नागरिकांमुळे शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, रंकाळा तलाव, गंगावेश आदी परिसरात वाहने आणि नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र दुपारपर्यंत होते. अशा नागरिकांना
हटकताना पोलिसांना नाकीनऊ आले होते. कोरोना काळातही नागरिक मोटारकारसह पूर पाहण्यास बाहेर पडल्यामुळे सायंकाळपर्यंत सर्वत्र गर्दीचे चित्र होते.
पंचगंगा स्मशानभूमीवर भार वाढला
कसबा बावडा व कदमवाडी स्मशानभूमीत पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे याचा सर्व भार पुन्हा पंचगंगा स्मशानभूमीवर वाढला. यापूर्वी केवळ येथे कोरोना संसर्ग मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र, शुक्रवारपासून येथे सर्वच प्रकारच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात करण्यात आली.
फोटो : २३०७२०२१ कोल उमा टॉकीज
ओळी : लक्ष्मीपुरीसह शाहूपुरी परिसरात पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली होती. त्यामुळे राजाराम रोडवरील पार्वती टॉकीज-उमा टॉकीज या मार्गावर शुक्रवारी वाहतूक कोंडी झाली. (छाया : नसीर अत्तार)