कोल्हापूर : सर्वसामान्य कोरोनाबाधीत रुग्ण व बालकांवरील उपचार पद्धती वेगवेगळी असते. तिसऱ्या लाटेत ऑक्सीजन व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या बालकांवरील उपचारासाठी तज्ञ व प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी असणे गरजेचे आहे तरी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण द्यावे अशी सुचना बालरोगतज्ञांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला केली.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी जिल्ह्यातील सर्व बालरोग तज्ञांची दुरदृष्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दुरदृष्यप्रणालीद्वारे बालरोग तज्ञ डॉ. मोहन पाटील, डॉ.नरेंद्र नानीवडेकर, डॉ. अर्चना पाटील, डॉ. आनंद गुरव, डॉ. साईराज पवार यांच्यासह जिल्ह्यातील १४० बालरोग तज्ञ यात सहभागी झाले.यावेळी बालरोग तज्ञांनी कोरोनाबाधीत बालकांवर उपचार करताना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यांना व्हेंटिलेटर किंवा ऑक्सीजन लावावे लागणार असेल तर त्यासाठी तज्ञ व प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ असणे गरजेचे आहे. संभाव्य तिसऱी लाट येण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात यावे, असे झाल्यास प्रत्येक बालरुग्णाला उपचारासाठी कोल्हापुरात पाठवण्याऐवजी त्यांच्यावर तालुक्याच्या ठिकाणीच योग्यरितीने उपचार करता येईल व शहरावरील ताण कमी होईल अशी सुचना केली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी किमान १ हजार बेडची तयारी करावी लागेल. साधे व ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी लागेल. तालुकानिहाय बेड वाढवावे लागतील असे मत मांडले. सीपीआरच्या बालरोग विभाग प्रमुख डॉ. संगिता कुंभोजकर यांनी आयसोलेशन, होम केअर करताना रूग्णांची अतिशय काळजी घ्यावी. या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी सुमारे १९० च्या आसपास आयसीयू बेड लागतील असे सांगितले.
CoronaVirus kolhapur : बालकांवरील उपचारांसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 7:40 PM
CoronaVirus collector docter kolhapur : सर्वसामान्य कोरोनाबाधीत रुग्ण व बालकांवरील उपचार पद्धती वेगवेगळी असते. तिसऱ्या लाटेत ऑक्सीजन व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या बालकांवरील उपचारासाठी तज्ञ व प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी असणे गरजेचे आहे तरी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण द्यावे अशी सुचना बालरोगतज्ञांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला केली.
ठळक मुद्देबालरोग तज्ञांची जिल्हा प्रशासनाला सुचना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर आढावा बैठक