शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

प्रशिक्षित कॉँग्रेस कार्यकर्ते होणार लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 4:34 PM

कोल्हापूर : ‘अच्छे दिन’ म्हणजे चुनावी जुमला असल्याचे खुद्द भाजपाचेच ज्येष्ठ नेते सांगत आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या कार्यकाळात एकही ...

ठळक मुद्देप्रशिक्षित कॉँग्रेस कार्यकर्ते होणार लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सज्जकॉँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर :  भाजप सरकारमुळे एकही घटक समाधानी नाही : सोनल पटेल

कोल्हापूर : ‘अच्छे दिन’ म्हणजे चुनावी जुमला असल्याचे खुद्द भाजपाचेच ज्येष्ठ नेते सांगत आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या कार्यकाळात एकही घटक समाधानी नसून महागाईसह विविध प्रश्नांमुळे जनता निराश व नाराज असल्याची टीका कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र सहप्रभारी सोनल पटेल यांनी मंगळवारी येथे केली. येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची प्रशिक्षित फौज शिबिराच्या माध्यमातून तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.फुलेवाडी येथील अमृत हॉल येथे कॉँग्रेसतर्फे आयोजित दोन दिवसीय संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती महापौर शोभा बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस आमदार रामहरी रुपणवार, प्रवक्ते हरिष रोगे, यशवंत हाप्पे, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी खा.कल्लाप्पाण्णा आवाडे, जयवंतराव आवळे, माजी मंत्री भरमू पाटील, प्रकाश आवाडे, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, मुख्य प्रशिक्षक राजीव साहू, प्रशिक्षक चैतन्य रेड्डील राजेंद्र वानखेडे, विनोद नायर, अल नासिर झकेरीया आदींची होती.पटेल म्हणाल्या, भाजप सरकारच्या कारभारामुळे जनता नाराज आहे. देशाच्या इतिहासातील राफेल हा आतापर्यंतचा मोठा घोटाळा असून लोकांमध्ये यामुळे सरकारविरोधात चीड निर्माण झाली आहे. राहुल गांधी हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा आग्रह धरला होता. त्यांनी यापूर्वी ‘एनएसयुआर’, युथ कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे असेच प्रशिक्षण घेतले होते. त्यानुसार हे प्रशिक्षण शिबिर घेतले जात असून यानंतर प्रत्येक ब्लॉकमध्ये ते घेतले जाणार आहे. यामाध्यमातून प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज आगामी निवडणुकांसाठी सज्ज ठेवली जाणार आहे.रुपणवार म्हणाले, आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची गरज होती. कॉँग्रेसवर होणारे आरोप खोडून काढून या सरकारचे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांना करावी लागणार आहे.सतेज पाटील म्हणाले, राहुल गांधींना अभिप्रेत बूथ टू बूथ व घर टू घर या मोहिमेद्वारे लोकांशी साधण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी या प्रशिक्षणाचा चांगला उपयोग कार्यकर्त्यांना होणार आहे.पी. एन. पाटील म्हणाले, राज्यातील भाजप सरकारच्या बारा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत परंतु त्यांचे राजीनामे घेतलेले नाहीत. पाकिस्तानला धडा शिकवू म्हणणारे या सरकारमधील लोक त्या ठिकाणी केक कापायला जातात, तर माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रींनी पाकिस्तानचे रणगाडे कापायला लावले होते. हा या दोन्ही सरकार व नेत्यांमधील फरक आहे.

सरकारने दुष्काळ जाहीर करावाराज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सतेज पाटील यांनी केली. कॉँग्रेसने

पुरोगामी विचार एकत्र आल्यानेच शिरोळचा विजयसर्व पुरोगामी विचारांचे पक्ष, संघटना एकत्र आल्यानेच शिरोळ नगरपालिकेत जातीयवादी पक्षांचा पराभव झाला आहे. ही सुरुवात असून अशाच पध्दतीने आघाडी इथून पुढेही राहण्यासाठी प्रदेश पातळीवर चर्चा सुरु असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर