येथील स्व. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानाचे तालुक्यातील ९६० शिक्षकांसह विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ. मोरे यांनी निवडणूक प्रक्रिया कशी राहील, याबाबत तीन सत्रात माहिती दिली. ईव्हीएम मशीन हाताळणी, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना याबाबत विस्तृत माहिती दिली. व्हिडिओद्वारे मार्गदर्शनही करण्यात आले.
मतदानासाठी नियुक्त केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांना यावेळी मतदान नमुने भरणे, ईव्हीएम हाताळणे, मतदान प्रक्रिया याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके, नायब तहसीलदार संजय काटकर, पी. जी. पाटील, सुजय हलवाई यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, १४ जानेवारीला शिरोळ येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत निवडणूक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
फोटो - ०८०१२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी ईव्हीएम मशीन हाताळणीबाबत मार्गदर्शन केले.