कोल्हापूर : ‘गोकुळ’तर्फे जनावरांच्या आयुर्वेदिक औषधोपचारांचे स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. संघाच्या आनंदराव पाटील-चुयेकर प्रशिक्षण केंद्रामार्फत विविध प्रशिक्षण दिले जाते. यावेळी पशुसंवर्धन विभागातर्फे स्वयंसेवकांना जनावरांवर आयुर्वेदिक औषधोपचारांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यामध्ये जनावरांच्या आजारांमधील आयुर्वेदिक उपचार पध्दतीचे महत्त्व व त्याची उपयोगिता, हर्बल गार्डन व्हिजिट व आयुर्वेदिक औषधोपचारांमध्ये उपयोगी येणाऱ्या वनस्पती व पदार्थांची ओळख व त्यांचे गुणधर्म, प्राथमिक आयुर्वेदिक औषधोपचारांमध्ये स्वयंसेवकांची जबाबदारी व कार्यपध्दती, जनावरांचे आजार व त्यासाठी वापरण्यात येणारी उपचार पध्दती अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ. विजय मगरे यांनी आभार मानले. यावेळी पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यु. व्ही. मोगले, सहाय्यक व्यवस्थापक डॉ. पी. जे. सोळुके, डॉ. दळवी, डॉ. कामत, डॉ. गोऱ्हे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
‘गोकुळ’तर्फे जनावरांच्या आयुर्वेदिक औषधोपचारांचे स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. (फोटो-१६०७२०२१-कोल-गोकुळ)