आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : निपाणी बसस्थानकांतून कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी निपाणी - कागल -रंकाळा ही एस.टी सोडण्यास गुरुवारी मज्जाव करीत बसस्थानकांतील महाराष्ट्रातील वाहतूक नियंत्रण कक्षाला कुलूप लावण्यात आले. कर्नाटक प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाची कोल्हापूर विभागाने तत्काळ दखल घेत कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकांतही कर्नाटकच्या बसेसना येण्यास मज्जाव केला.तासभर हा प्रकार सुरु होता, मात्र या घटनेनंतर कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने नमते घेत निपाणी- कागल - रंकाळा गाडीची सेवा सुरुळीत केली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कागल आगाराच्यावतीने निपाणी-कागल-रंकाळा ही एस.टी. बस बुधवारी सुरु केली होती. मात्र या गाडीला चिक्कोडीच्या जिल्हा आगारप्रमुखांनी बस सुरु करता येणार नाही अशी भूमिका घेत गाडी अडवली. याला येथील शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी जोरदार विरोध करीत ही गाडी पुन्हा सुरु करण्यास भाग पाडले होते. मात्र गुरुवारी सकाळी कर्नाटक प्रशासनाने पुन्हा एकदा आडमुठी भूमिका घेत निपाणी बसस्थानकात प्रवेश न देता ही गाडी बाहेर काढली. तसेच निपाणी बसस्थानकांतील महाराष्ट्रांतील वाहतूक नियंत्रण कक्षास कुलूप लावून तेथे वाहतूक नियंत्रकास थांबण्यासही मज्जाव केला. या घटनेची माहिती कोल्हापूर विभागाचे नियंत्रक नवनीत भानप यांना मिळताच त्यांनीही कर्नाटकांतील गाड्यांना मध्यवर्ती बसस्थाकांत घेण्यास मज्जाव केला. महामंडळाची ही मात्रा लागू पडली. कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेत निपाणी - कागल -रंकाळा गाडीची सेवा सुरळीत सुरु केली. ही वाहतूक सुरळीत केल्यानंतर कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकांतही दुपारनंतर कर्नाटकातील बसवाहतूक सुरुळीत सुरु झाली.
दर वीस मिनिटांनी निपाणीपर्यंत बस.कागल आगारातर्फे पहिल्यांदाच ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. रंकाळा,राजारामपुरी, कागल, निपाणी असा मार्ग असणार आहे. निपाणी येथून सकाळी ८ वा. गाडी सुटणार आहे. तर रंकाळा येथून सकाळी ७.३० वा. गाडी सुटणार आहे. रात्री आठ वाजेपर्यंत या फेऱ्या सुरु राहणार आहेत. ही गाडी आर्डिनरी असून अन्य बसगाड्यापेक्षा प्रवाशांचे दहा रुपये वाचणार आहेत. काही काळ गोंधळ....कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या पदाधिकारी यांनी निपाणी - कागल - रंकाळा ही गाडी अडविल्या नंतर कोल्हापूर विभागाने कडक भूमिका घेत मध्यवर्ती बसस्थानकातही कर्नाटकांच्या गाड्यांना प्रवेश बंद केला. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकांच्या बाहेर सोडण्यात येते होते. आचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशामध्ये गोंधळ उडला होता. प्रवाशांच्या मागणीनुसार व नियमात राहूनच बुधवारी निपाणी - कागल -रंकाळा ही गाडी सुरु केली होती. मात्र कर्नाटक प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने ही गाडी गुरुवारी सकाळी आडवली. त्यामुळे आम्हीही काही काळ कर्नाटकांतील गाड्यांना मध्यवर्ती बसस्थानकांत घेण्यास बंदी घातली. या भूमिकेनंतर मात्र त्यांनी तात्काळ निपाणी - कागल - रंकाळा गाडी सुरुळीत सुरु केल्याने आम्ही कर्नाटकांतील बस गाड्याना बसस्थानकांत प्रवेश देण्यातनवनीत भानप,विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग -