शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पूरग्रस्तांना मदतवाटपाचे पारदर्शी आरे मॉडेल --(ऑन द स्पॉट रिपोर्ट )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:29 AM

आरे हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गांव तुळशी व भोगावती नदीच्या काठावर वसले आहे. कोल्हापूरपासून पश्चिमेला २२ किलोमीटरवर हे गाव येते. गावांला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा आहे.

विश्र्वास पाटील -कोल्हापूर : आरे (ता. करवीर) येथे महापुरात नुकसान झालेल्या लोकांना अत्यंत सुत्रबध्दरित्या मदतीचे वाटप सुरु आहे. त्या गावांत मदत घेवून जाणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून त्याबध्दल कौतुक व्यक्त होत आहे. पूरग्रस्त अनेक गावांमध्ये आलेल्या मदतीवरून मारामाºया सुरु झाल्या आहेत. मदतीची पळवापळवी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर या गावाचे वेगळेपण उठून दिसणारे आहे. धान्य स्वरुपातील मदत आता पाठवू नये असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

आरे हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गांव तुळशी व भोगावती नदीच्या काठावर वसले आहे. कोल्हापूरपासून पश्चिमेला २२ किलोमीटरवर हे गाव येते. गावांला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक टायर ट्रॅक्टर व बुलडोझर असणारे हे गांव आहे. एकूण शेतीखालील जमिन आणि लोकसंख्या याचा विचार करता दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतही गाव जिल्ह्यांत पहिल्या पाचमध्ये येईल इतके हे समृध्द गांव परंतू महापुराने मोठे नुकसान केले. महापुरात गावाचे शंभर टक्के स्थलांतर नवीन वसाहतीत झाले. आता या संकटानंतर गावाच्या मदतीला साºया महाराष्ट्रातून मदत येवू लागली आहे.

मदतवाटप समन्वय समितीगावासाठी येणारी सर्व मदत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आनंदराव खराडे यांच्या घरांत एकत्रित केली जात आहे. ज्यांना थेट ग्रामस्थांना मदत द्यायची आहे, ते जावून लोकांना मदत देवू शकतात. त्यांना पूरक सहकार्य ग्रामस्थ करत आहेत. मदतवाटप कामाचा समन्वय करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये सरपंच साक्षी कुंभार, उपसरपंच अमर वरुटे, महेश वरुटे, जयदिप मोहिते, विश्र्वास वरुटे, निवास मोहिते, एकनाथ गुरव, बबन चौगुले, पोलिस पाटील विनायक लोहार, तलाठी नरेंद्र झुंबड व ग्रामसेवक दीपा यादव यांचा समावेश आहे.  

मदत वाटप सुत्र ---गावची लोकसंख्या २८५४. पूरबाधित कुटुंबे : २९० :  पूरग्रस्त लोकसंख्या : १४८६. पडलेली घरे : ३२समितीने तातडीने घर टू घर जावून सर्व्हे करून पूरग्रस्तांची संख्या निश्चित केली. त्यानुसार प्रत्येकी ५ किलो तांदूळ, गहू, आट्टा, एक किलो खाद्यतेल, प्रत्येकी १ किलो कांदा व बटाटे, मिनरल वॉटर कुटुंबासाठी रोज ५ लिटर आणि एका कुटुंबासाठी १ किलो चटणी असे सुत्र निश्चित केले.मदत वाटली कशी..आलेल्या मदतीची पॅकेट तयार होती. मदत वाटपाचे रजिस्टर घालून प्रत्येक कुटुंबास रोज एक टोकन दिले जाते. रजिस्टरवर कुटुंब प्रमुखाची सही घेतली जाते. त्यानंतर ते टोकून जमा केल्यानंतर प्रत्यक्ष मदत मिळते. रोज सकाळी १० ते १ पर्यंत हे काम गावांतील तरुण कार्यकर्त्याच्या सहकार्याने चालते. त्याची आदल्यादिवशी गावांत दवंडी दिली जाते.काय साधले..सुत्रबध्दपणे मदत वाटप सुरु असल्याने पूरग्रस्त लोकांना त्याचे अत्यंत पारदर्शीपणाने वाटप झाले. मला मदत मिळाली नाही किंवा कुणाला जास्त मिळाली याबद्दल कुणाचीही एकही तक्रार नाही. सर्व राजकीय गट एकत्र येवून गावाचे काम म्हणून या गोष्टीकडे पाहिल्याने कुठेच अडचण आली नाही.मदत केली कुणी..औरंगाबादहून संभाजी ब्रिगेड : २ ट्रक धान्यपुण्यातून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई : १ ट्रक धान्य व ब्लँकेटतूळजापूर देवस्थान : १ ट्रक धान्य व कपडेचर्मकार सेवा संस्था कणकवली : धान्यशिवसाम्राज्य फाऊंडेशन फोंडाघाट : धान्य व औषधेपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती : १ ट्रक धान्यभोसरीचे आमदार महेश लांडगे : धान्य १ ट्रक व एक ट्रक कडबाकुट्टी पृथ्वी एंटरप्रायजेस पूईखडी (कोल्हापूर) : ४० कुटुंबांना भांडी सेटअर्थमुव्हर्स असोसिएशन : पशुखाद्यपंख फाऊंडेशन कोल्हापूर : कपडे व खाद्यतेलआरोग्य तपासणी : अ‍ॅस्टर आधार, सावली केअर सेंटर, कणेरी मठ रुग्णालयदापोली व बेले ग्रामस्थ : घरांची पडझड झालेल्या ३२ कुटुंबाना दापोली (जि.रत्नागिरी) ग्रामस्थांकडून प्रत्येकी ४ हजारांची व बेले (ता. करवीर) ग्रामस्थांकडून प्रत्येकी १ हजारांची रोख मदत(याशिवाय छोट्यामोठ्या  विविध १५० संस्थांकडून विविध प्रकारची मदत)

  • मेस्त्री धावून आले.

बीडशेड (ता. करवीर) ९ मेस्त्री महापूर उतरल्यावर एकादिवशी आपापले साहित्य घेवून आले व त्यांनी दिवसांत १८० मोटारसायकली मोफत दुरुस्त करून दिल्या.

  • दिवसांत वीजपुरवठा..

गावांतील ज्या घरांतील वीज पुरवठा खंडित झाला होता अशा सर्व घरांमध्ये चार वायरमननी दिवसभर राबून वीजपुरवठा दुरुस्त करून दिला.

  • थेट जेवणाची मदत

महापुराच्या काळात व पूर ओसरल्यानंतरही बाचणी, कारभारवाडी, सडोली खालसा, सावरवाडी, म्हाळुंगे, बेले, येळवडे, सोनाळी, हसूर, कोथळी ही गांवे अक्षरक्ष: धावून आली. त्यांनी जेवून करून आणून पूरग्रस्तांना वाढले. माहेरवाशिणींना दुरड्या भरून शिदोरी देतात तसे या गावांतून महिलांनी जेवण पोहोच केले.

  • मदत काय काय मिळाली

तांदूळ, आटा,खाद्यतेल, चटणी,कपडे, साड्या ड्रेस, ब्लँकेट, बेडशीट, चादरी, टॉवेल, भांडी सेट,टूथब्रश, शालेय साहित्य आणि पिण्याचे पाणी

आरे गावांचे मला दोन गोष्टीसाठी कौतुक वाटते. त्यांनी ज्यापध्दतीने महापुरात तातडीने लोकांचे व जनावरांचे स्थलांतर केले ते जास्त महत्वाचे होते. त्यामुळे जिवितहाणी झाली नाही. मदत वाटपाची पध्दतही अत्यंत छान असून त्यामध्ये समानता आहे. हे अन्य गावांनी आपत्तीव्यवस्थापन व मदत कार्याचे मॉडेल म्हणून वापरता येण्यासारखे आहे.डॉ. किमया शहाविश्वस्त, लोटस मेडिकल फाऊंडेशन कोल्हापूर 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर