या परिसरातील शेतकरी उन्हाळ्यामध्ये नदीकाठची लाल माती वीटभट्टी ठेकेदारांना विक्री करतात.
हे ठेकेदार वाहतुकीचा खर्चाची बचत करण्यासाठी जे.सी.बी. मशीनच्या साह्याने प्रमाणापेक्षा जास्त माती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून वाहतूक करतात. कमी वेळेसह वाहतुकीचे अधिक हेलपाटे वाचवण्यासाठी टॅक्टर ड्रायव्हर सुसाट वेगाने या रस्त्यारून मातीची वाहतूक करत असल्यामुळे ट्रॉलीमधील अधिक माती रस्त्यावर सांडत आहे. अधून- मधून पडणाऱ्या वळवाच्या पावसामुळे या भागात सर्वत्र रस्त्यावर चिखल होऊन रस्ता निसरडा होत असल्यामुळे रस्त्यांवरून वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांच्या जिवाला चांगलाच घोर लागला आहे. वाहने स्लिप होऊन अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक माती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांवर कारवाई करण्याची मागणी या भागाच्या ग्रामस्थांतून होत आहे.
फोटो ओळ::- माजगाव- खोतवाडी रस्त्यावर माती सांडून रस्ता चिखलयुक्त झाला आहे.