कोल्हापूर : कचरावेचकांना बर्मन आयोगाच्या शिफारशीनुसार कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी ‘एकटी’ या संस्थेतर्फे मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कचरावेचकांचा मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन देण्यात आले. शासनाने मागण्यांबाबत गांभीर्याने विचार न केल्यास हिवाळी अधिवेशनावर व्यापक मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. टाऊन हॉल उद्यानामधून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाचे नेतृत्व अनुराधा भोसले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात अनुराधा भोसले, जैनुद्दीन पन्हाळकर, वनिता कांबळे, भारती कोळी, लक्ष्मी कांबळे, आक्काताई गोसावी, जरिना बेपारी, सुनीता गोसावी, रेखा गोसावी, अनुसया शिंदे, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)‘एकटी’ संस्थेतर्फे कचरावेचक महिलांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्या गोणपाटावर लिहिल्या असल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले. मागण्या गोणपाटावरमोर्चा म्हटले की, आंदोलकांच्या हातांतील मागण्यांचे फलक लक्षवेधी ठरतात; पण कचरावेचक महिलांनी हातात गोणपाटे घेतली होती. त्यांवर त्यांनी आपल्या विविध मागण्या लिहिल्या होत्या. त्यामुळे मागण्या लक्षवेधी ठरल्या.
कचरावेचकांचा मोर्चा, निदर्शने
By admin | Published: October 26, 2016 12:40 AM