कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ म्युकरमायकोसिसच्या रचग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २४ जण सीपीआरमध्ये उपचार घेत असून, आतापर्यंत ८ रुग्णांवर सीपीआरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील ४९ जणांना या आजाराची लागण झाली. त्यापैकी पाचजणांचा मृत्यू झाला असून, १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या सीपीआऱमध्ये उपचार घेत असलेल्या २४ पैकी ९ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत; तर १५ जण पोस्ट कोव्हिड किंवा नॉनकोव्हिड आहेत. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची प्रकृती वेगाने सुधारत असल्याचे सीपीआरच्या कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली.
कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील खासगी रुग्णालयांमध्ये २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.