लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य शासनाने म्युकरमायकोसिस आजाराचा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्यात आला आहे. कोल्हापुरातील ‘ॲपल’, ‘डी. वाय. पाटील’, ‘डायमंड’, ‘सिध्दगिरी’ व सीपीआरमध्ये या योजनेतंर्गत उपचार होणार आहेत. बेळगावच्या ‘केएलई’ रुग्णालयाचा समावेश करण्याता आला आहे.
कोरोनाचे संकट असताना ‘म्युकरमायकोसिस’ या नवीन आजाराने डोके वर काढले आहे. ‘म्युकरमायकोसिस’चे उपचार महागडे असून, ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यासाठी राज्य शासनाने या रुग्णांचा उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर ‘म्युकरमायकोसिस’चा समावेश महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काेल्हापुरातील पाच व बेळगावच्या ‘केएलई’ हॉस्पिटलचा यामध्ये समावेश आहे.
या रुग्णालयात होणार उपचार -
ॲपल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट
डायमंड हॉस्पिटल, कोल्हापूर
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल
राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेज व सीपीआर रुग्णालय
सिध्दगिरी हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर
केएलई हॉस्पिटल, बेळगाव