कोल्हापूर : येथील नर्सरी बागेतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरावर शनिवारी झाड कोसळल्याने मंदिराच्या वरील भागाचे मोठे नुकसान झाले. कोसळलेले झाड धोकादायक असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे अखेर हे झाड मंदिरावर पडले आणि त्याचे नुकसान झाले.सीपीआर चौक ते सोन्या मारुती चौक दरम्यान असलेल्या नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी तसेच ताराराणी यांचे मंदिर १९१७ साली दस्तुरखुद्द छत्रपती शाहू महाराज यांनीच बांधली आहेत. या मंदिराच्या परिसरात काही झाडे वाढली आहेत. त्यांची योग्य देखभाल न घेतल्यामुळे ती कशीही वाढलेली आहेत. त्यातील दोन झाडे पडण्याची स्थितीत होती.
शुक्रवारी आयुक्तांनी क ार्योत्तर मंजूर दिली होती. तोपर्यंत शनिवारी सकाळी झाड मंदिरावर कोसळले. झाड मंदिरावर कोसळल्याने मंदिराच्या वरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दगडी मंदीरावरील भागात एक मजला असून त्याच्या कौलांचे तसेच जुन्या खापऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले.झाड कोसळल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेने लगेच तेथे धाव घेतली. जेसीबी, कटरच्या सहाय्याने कोसळलेले झाड बाजूला केले. शिवाय तेथील आणखी एक झाड काढून टाकण्यात आले.