खोची : आरोग्य राज्यमंत्री व शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या वाढदिवसानिमित्त नरंदे येथील शरद कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे उपाध्यक्ष थबा कांबळे यांच्या हस्ते व संचालक डी. बी. पिष्टे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
प्रचंड संघर्षातून स्वकर्तृत्वातून मंत्री राजेंद्र पाटील यांचे नेतृत्व तयार झाले आहे.
सामाजिक, सहकार, औद्योगिक, आर्थिक, शिक्षण या क्षेत्रात भरीव कामगिरी करून विकासाला गतिमान करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. विकासाची दूरदृष्टी असल्याने राज्य पातळीवर त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, असे मत उपाध्यक्ष थबा कांबळे यांनी व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए. आवटी, कार्यालयीन अधीक्षक अनिल पाटील, चीफ अकाउंटंट सी.बी. बिरनाळे, डेप्युटी चीफ अकाउंटंट आर. बी. पाटील, परचेस ऑफिसर बळवंत बेलेकर, डिस्टलरी इन्चार्ज कुलदीप पांढरे, व्हेइकल इन्चार्ज मनोहर कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, लेबर ऑफिसर अमोल मगदूम, कामगार युनियन अध्यक्ष उदय भंडारी उपस्थित होते.
फोटो ओळी-आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित शरद सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उपाध्यक्ष थबा कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संचालक डी.बी. पिष्टे, बी.ए. आवटे, अनिल पाटील, आर.बी.पाटील, उदय भंडारी, अमोल मगदूम, चंद्रकांत पाटील, नागेंद्र पाटील उपस्थित होते.