शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनंतर ‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 6:47 PM

अहवालातील ठरावीक मुद्द्यांची तपासणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश लेखा परीक्षा मंडळाचे (पदुम), विशेष कार्य अधिकारी रा. सं. शिर्के यांनी ११ जानेवारीस दिले. यासाठी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक (वर्ग एक) बी.एस.मलुगडे यांची नियुक्ती केली आहे. याबाबत संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दुग्ध विभागाकडे तक्रार केली होती. दहा दिवसांत लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याचा आदेश शिर्के यांनी दिला आहे.महाडिक यांनी गेल्याच आठवड्यात ट्विट करून वार्षिक सभेनंतर गेले चार महिने मी शांत होते. संघामध्ये चालू असलेल्या गैरकारभाराचे पुरावे जमवत होते. त्याचे फळ लवकरच समोर येईल असे जाहीर केले होते. त्यावरून त्या चौकशीची मागणी करणार हे स्पष्टच होते. त्यानुसार शासनाने हे आदेश दिले आहेत.‘गोकुळ’दूध संघाच्या लेखापरीक्षकांनी सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालात खरे व अचूक चित्र उघडकीस आणलेले नाही,अशी तक्रार महाडिक यांनी संबंधित विभागाकडे केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार संघाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. गोकुळ संघाने या कालावधीतील कागदपत्रे चौकशी कामे संबंधित अधिकाऱ्यांना द्यावीत असेही आदेशात म्हटले आहे.अहवालातील ठरावीक मुद्द्यांची तपासणीलेखापरीक्षण अहवालात परिशिष्ट अ, ब, क असतात. परिशिष्ट अ मध्ये गंभीर मुद्द्यांची नोंद केली जाते, याच मुद्द्यांची चाचणी लेखापरीक्षणात तपासणी करावी,अशी मागणी महाडिक यांनी केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ