कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकूळ) २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षणास अखेर सोमवारी सुरुवात झाली. संचालिका शौमिक महाडिक यांनी केलेल्या तक्रारीनुसार विशेष लेखापरीक्षक वर्ग,सहकारी संस्था (दुग्ध) अहमदनगर बी. एस. मसुगडे यांच्या नेतृत्वाखालील पथक तीन दिवस तपासणी करणार आहे.‘गोकूळ’दूध संघाच्या लेखापरीक्षकांनी सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालात खरे व अचूक चित्र उघडकीस आणलेले नाही. लेखापरीक्षण अहवालात परिशिष्ट अ, ब, क असतात. परिशिष्ट अ मध्ये गंभीर मुद्यांची नोंद केली जाते, याच मुद्यांची चाचणी लेखापरीक्षणात तपासणी करावी, अशी मागणी शौमिका महाडिक यांनी केलेली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार रा. सं. शिर्के यांनी संघाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बी. एस. मसुगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लेखापरीक्षणास सुरुवात केली आहे. साधारणता तीन दिवसात तपासणीचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न पथकाचा आहे. आदेशापासून दहा दिवसात तपासणी करून संबधित विभागाला अहवाल द्यायचा आहे.
‘गोकूळ’चे चाचणी लेखापरीक्षण अखेर सुरू, दहा दिवसात अहवाल द्यावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:17 IST