कोल्हापूर : कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करत शहरात पारंपारिक पध्दतीने शुक्रवारी स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६४ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांना शहरातील मंच, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, मावळ्यांनी विविध उपक्रमांनी मानाचा मुजरा करण्यात आला.शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्यावतीने सकाळी सहा वाजता रुईकर कॉलनी येथील संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्यास मंत्रोच्चारात रुद्र जलाअभिषेक करण्यात आला. ध्येय आणि प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला. जयजयकार करण्यात आला. यावेळी शंभूराजे मंचचे अध्यक्ष सुरज ढोली , अभिजीत इंगळे , प्रथमेश पाटील , विक्रम पाटील , सूर्यभान ढोली उपस्थित होते.
या मंचच्या प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती, प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली. येथे शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने सकाळी सात वाजता छत्रपती शंभुराजे यांच्या मूर्तीस जल अभिषेक करण्यात आला. त्यानंतर फुलांची सजावट करून उपस्थित शिवभक्तांच्या हस्ते पूजन करून, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ध्येय आणि प्रेरणा मंत्राचे पठण करण्यात आले. त्यानंतर साखर पेढ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, उपाध्यक्ष योगेश रोकडे, संदीप पाडळकर, सुशांत शिंदे, प्रशांत जाधव, प्रवीण कुरणे, प्रशांत पाटील, गणेश मांडवकर, तुषार खोंद्रे , तुकाराम खराडे , श्रेयस कुरणे , मनीष बडदारे, प्रभाकर पाटील, सुजित जाधव, तेजस जाधव, राज शिंदे , प्रथमेश लगाटे उपस्थित होते. पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे शिवशंभू भक्तांच्या उपस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पादुकांना जलाभिषेक, दुग्धाभिषेक करण्यात आला. ध्येय आणि प्रेरणा मंत्र, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्तोत्र म्हणण्यात आले. यावेळी ओंकार शिंदे, किसन खंदारे, प्रसन्न वैद्य, सिद्धेश सावंत, जयराज ओतारी, प्रणाम बुधले, संकेत पंडित, सुजवल घोटणे, शुभम माळवी, रत्नदीप चोपडे, आकाश गुरवळ, गौरव गुरवळ, आदी उपस्थित होते.सफाई कामगारांचा सत्कारछत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्य संयुक्त जरगनगर-रामानंदनगरतर्फे भागातील सफाई कामगारांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आयसोलेशन हॉस्पिटल कोवीड वॉर्ड येथे सफाई साहित्य झाडू, फरशी लिक्विड, मोब, खराटे मदत म्हणून देण्यात आले. यावेळी अमोल कदम, नाना सावंत, अक्षय मगदूम, सुजय मेंगाणे, अथर्व साळोखे, तुषार पाटील, धनंजय जरग, संदीप पाटील, सागर कदम, निखिल शिरडवडे, अक्षय पोवार, तुषार जाधव उपस्थित होते.संयुक्त जुना बुधवारपेठेतर्फे जयंती साजरीसंयुक्त जुना बुधवार पेठेच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अनिल निकम, उदय भोसले,सुशिल भांदिगरे,सुशांत महाडिक,महेश शिंदे,मकरंद स्वामी,राजू कुंडले, मोहित पाटणकर,महेश फुटाणे,निलेश जाधव,बंडा आडगुळे,राम मिस्त्री उपस्थित होते.