विधिवत व फोटोपूजन चिरंजीव उमेश भोईटे व महेश भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले.
तमाम जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते, पाहुण्यांनी साश्रूनयनांनी सरांना श्रद्धांजली, पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी अनेकांना गहिवरून आले. अनेकांनी भोईटेसरांच्या विकासकामांच्या आणि व्यक्तिगत मदतीच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमास माजी खासदार धनंजय महाडिक, कृष्णराव किरुळकर, धैर्यशील पाटील, बाबासो पाटील, अरुण जाधव, प्रवीण पाटील, आर.वाय. पाटील, रविश पाटील, किसन चौगले, नेताजी पाटील, सुनील कांबळे, सुनीलराव सूर्यवंशी, नंदकिशोर सूर्यवंशी, शशिकांत पाटील चुयेकर, राहुल दादा देसाई, विलास कांबळे, महेश पाटील, जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे, धीरज डोंगळे, विश्वनाथ पाटील, सचिन पाटील, के. एस. बर्गे, आर.के. मोरे, अक्षय संकपाळ, भरत माळवी यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, बिद्री व भोगावती साखर कारखाना व गोकुळ दूध संघाचे संचालक, अधिकारी, कामगार, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पाहुणे, राजकीय, सामाजिक, शासकीय क्षेत्रातील मान्यवर, पंचक्रोशीतील सरपंच, नागरिक व पालकरवाडी व कसबा वाळवे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार शुभम भोईटे यांनी मानले.