उचगाव :
दर तीन वर्षांनी होणारी उचगावचे ग्रामदैवत मंगेश्वर देवाची त्रैवार्षिक यात्रा यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच गणेश काळे होते. यावेळी गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उचगावचे ग्रामदैवत श्री मंगेश्वर देवाची त्रैवार्षिक यात्रा दिनांक २३ एप्रिलपासून पाच दिवस होणार आहे; परंतु कोरोनाच्या महामारीमुळे अनेक गावच्या यात्रा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे उचगावकरांनीदेखील वार्षिक यात्रा रद्द करून फक्त धार्मिक विधी मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचे एकमताने ठरवण्यात आले.
यावेळी उपसरपंच मधुकर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले, पंचायत समिती सदस्य सुनील पोवार, माजी सरपंच मधुकर चव्हाण, अनिल शिंदे, वैभव पाटील, रमेश वाईंगडे, विजय यादव, दीपक रेडेकर, विनायक जाधव, दिनकर पोवार, कीर्ती मसुटे, नामदेव वाईंगडे, गुरुदेव माने, अमित निगडे, सचिन गाताडे, चंद्रकांत वळकुंजे, दत्ता यादव तसेच ग्रामस्थ, पुजारी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.