आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.२२ : जिल्हयातील पूरपरिस्थितीमुळे परीक्षा केंद्रावर उशिरा पोहचल्याने अनेक परीक्षार्थांना शनिवारी परीक्षेपासून वंचीत रहावे लागले. उशिरा आलेल्या परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारलेल्या त्यांनी केंद्राबाहेर गोंधळ घातला.
दरम्यान परीक्षेपासून वंचित राहिलेल्या परीक्षार्थींनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरात आलेल्या राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दिपक यांना ही निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या तर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ‘महाटेस्ट’ २०१७ चे अयोजन करण्यात आले होते.
शनिवारी दोन सत्रात ही परीक्षा झाली. पहिला पेपर सकाळी ११ वा. होता. यासाठी सर्व परीक्षार्थ्यांना सकाळी १०.३० वा. परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. मात्र पूर परीस्थितीमुळे जिल्हयातील अनेक मार्ग बंद झाल्याने काही परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास वेळ झाला.
उशिरा आलेल्या परीक्षार्थ्यांना केंद्रात घेण्यास नकार देण्यात आला. यामुळे देशभूषण हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, पद्मराजे हायस्कूल येथे काही उशिरा आलेल्या परीक्षार्थ्यांना आत घेण्यता आले नाही. त्यामुळे काही काळ विद्यार्थी व पालकांच्या मध्ये गोंधळ निर्माण झाला. यावेळी करवीर निवासीनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या मंत्री दिपक केसरकर यांना भेटून परीक्षाथीर्नी आपली कैफियत मांडली.