संतोष भोसलेकिणी : पुणे-बेंगळुरु महामार्गावरील घुणकी (ता. हातकणंगले) येथील ओढ्याच्या पुलावरच अवजड ट्रक ऍक्सल तुटून बंद पडल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुमारे पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनधारकांतून संताप व्यक्त केला जात होता. शनिवारी सकाळी साडेसहा वाजणेच्या सुमारास पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा माल वाहतूक ट्रक ओढ्याच्या पुलावरच रस्त्याच्या मध्यभागीच बंद पडला. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. सकाळ सकाळी तब्बल दोन तासाहुन वाहने अडकून पडली होती. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत होती. महामार्गाच्या सहापदरीकरण कामासाठी ठिकठिकाणी वाहतूक वळवण्यासाठी बनविण्यात आलेले पर्यायी रस्ते अपुरे असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.
Kolhapur: घुणकीजवळ ट्रक बंद पडला, पुणे-बेंगळुरु महामार्गावर वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 1:24 PM