कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत ३१ अर्ज अवैध ठरले. विद्यमान संचालक विश्वास पाटील हे एका बँकेचे थकबाकीदार जामीनदार, तर दिनकर कांबळे यांचा फर्म ‘गोकुळ’ला चाफकटर पुरवत असल्याबाबत हरकत घेतल्याने ते अडचणीत आले आहेत. याबाबत आज, बुधवारी निकाल देण्यात येणार आहे. दूध संस्थेचे संचालक नसल्याने युवराज पाटील, भैया माने, के. एस. चौगुले, राहुल आवाडे, कर्णसिंह गायकवाड, पुंडलिक पाटील या दिग्गजांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. दाखल २५० अर्जांपैकी ३१ अर्ज अवैध ठरले आहेत. ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी सोमवारी १८ जागांसाठी विविध गटांतून २५० जणांनी तब्बल ३८३ अर्ज दाखल केले होते. या अर्जांची मंगळवारी सिंचन भवन येथील निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण चौगले यांनी गटनिहाय छाननी प्रक्रिया राबविली. सुरुवातीला भटक्या विमुक्त जाती/जमाती गटातील दाखल अर्जांची छाननी केली. या गटातील सर्वच अर्ज पात्र ठरले. इतर मागासवर्गीय गटात विश्वास पाटील यांच्या अर्जावर विरोधी गटाने हरकत घेतली. कोल्हापूर अर्बन बँकेतील एका थकीत कर्जदाराला जामीन असल्याची तक्रार राहुल अशोक देसाई व रावसो पाटील यांनी केली. त्यावर दुपारी सुनावणी होऊन निकाल प्रलंबित ठेवण्यात आला. पाटील यांचा सर्वसाधारण गटातील अर्जाबाबत निकालही प्रलंबित ठेवला. या गटातील सहा अर्ज अवैध ठरले. अनुसूचित जाती/ जमाती गटातील राजू जयवंतराव आवळे यांच्या अर्जासोबत संबंधित संस्थेचे ते संचालक असल्याचे पत्र नव्हते. ते तीनपर्यंत सादर करण्यास सांगितले. दिनकर कांबळे हे ज्या फर्मचे भागीदार आहेत, त्या फर्ममधून ‘गोकुळ’ला चाफकटर पुरवले जातात, अशी हरकत बाळकृष्ण भोपळे यांनी घेतली. महिला गटात नर्मदा सावेकर यांच्या अर्जावर विद्यमान संचालक रवींद्र आपटे यांनी हरकत घेतली. या दोन्ही अर्जांवरील निर्णय प्रलंबित ठेवला आहे. सर्वसाधारण गटातून ज्या संस्थेचा ठराव नावावर आहे, त्या संस्थेचे संचालक नाहीत, लेखापरीक्षण नाही व दूध नाही यासाठी अशोक खोत, के. एस. चौगुले, युवराज पाटील, भैया माने, राहुल आवाडे, कर्णसिंह गायकवाड, बी. के. डोंगळे यांचे अर्ज अवैध ठरले. इतर मागासवर्गीय गटातून दूध संस्थेचे संचालक नसल्याबद्दल पुंडलिक पाटील, अविनाश पाटील यांच्यासह सहाजणांचे अर्ज अवैध ठरले.अर्बन बॅँकेला मिळाला न्याय : सतेज पाटील‘गोकुळ’ व राजाराम कारखान्याच्या निवडणुकीमुळे कोल्हापूर अर्बन बॅँकेला न्याय मिळाल्याची खोचक प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. अर्बन बॅँकेचे २ कोटी ३८ लाखांचे कर्ज महाडिक व त्यांच्या बगलबच्यांनी १० वर्षांपासून थकविले होते. या पैशाची वसुली करण्यासाठी बॅँकेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. २०१२ बॅँकेच्या बाजूने निर्णय लागला व थकबाकी वसुलीचे आदेश दिले. तरीही या मंडळींनी हे पैसे भरले नव्हते. आता राजाराम व गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज अपात्र ठरतो हे ध्यानात आल्यावर महाडिक, विश्वास नारायण पाटील आदींनी ही थकबाकी भरली आहे. या घटनेमुळे महाडिक यांची प्रवृत्ती लोकांसमोर आली आहे.अवैध ठरलेले अर्जअशोक खोत, के. एस. चौगुले, युवराज पाटील, भैया माने, अर्जुन इंगळे, चंद्रकांत पाटील, ज्योती दीपक पाटील, विजय पाटील, दिनकर जाधव, राहुल देसाई, विलास पाटील, राहुल आवाडे, शिवानंद डुंबरवाडी, कर्णसिंह गायकवाड, विश्वास इंगवले, विश्वास कुराडे, बी. के. डोंगळे, माणिक चव्हाण, अंबाजी पाटील.इतर मागासवर्गीय- सत्यजित पाटील, पुंडलिक पाटील, अविनाश पाटील, नीळकंठ पाटील, शामराव भावके, सर्जेराव पाटीलअनुसूचित जाती- दत्तात्रय कांबळे.महिला - संगीता प्रभाकर पाटील, सुजाता संभाजी तहसीलदार, तेजस्विनी जयवंत पाटील. मतदार संघ वैधअवैधप्रलंबित सर्वसाधारण१२६२११ महिला४२३१ अनुसूचित जाती११११ इतर मागासवर्गीय३०६१भटक्या विमुक्त६-
विश्वास पाटील, दिनकर कांबळे अडचणीत
By admin | Published: March 25, 2015 1:01 AM