शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

पीटीएम-दिलबहार समर्थकांत तुफान दगडफेक

By admin | Published: April 28, 2015 12:51 AM

कोल्हापुरात तणाव : पोलिसांचा सौम्य लाठीमार; वाहनांचे नुकसान; ६० जणांवर गुन्हा; फुटबॉल सामन्यातील आव्हानात्मक हावभावाची परिणती

कोल्हापूर : येथील शाहू स्टेडियमवर झालेल्या दोन तालमींदरम्यानच्या फुटबॉल सामन्यात एका खेळाडूने केलेल्या आव्हानात्मक हावभावामुळे सामन्याला गालबोट लागले आणि मैदानावरील खेळातील संघर्ष नंतर रस्त्यावर सुरू झाला. सामना संपल्यानंतर दोन्ही बाजंूनी जोरदार दगडफेक झाल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. दगडफेकीत एका चारचाकीसह काही दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. दगडफेक करणाऱ्या जमावाला पोलिसांनी लाठीमार करून पांगविले. रस्त्यावरील दगडफेकीमुळे भयभीत झालेल्या व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली. याप्रकरणी ६० जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पारंपरिक प्रतिस्पर्धी दिलबहार तालीम विरुद्ध पाटाकडील तालीम या दोन तुल्यबळ संघांत सोमवारी शाहू स्टेडियमवर फुटबॉल सामना झाला. सामन्यात स्टेडियमच्या उत्तरेकडील बाजूने एक दगड ) पाटाकडील तालीम मंडळाच्या दीपक थोरात या खेळाडूच्या दिशेने पडला. त्यामुळे तो काहीसा संतप्त बनला. ‘पाटाकडील’ने जेव्हा दिलबहार तालमीवर गोल केला त्यावेळी दीपक थोरात याने प्रेक्षकांसमोर जात आव्हानात्मक हावभाव केले. त्यामुळेच तणाव वाढला आणि त्याचे पर्यवसान दगडफेक, लाठीमारात झाले. खेळाडूंमधील ईर्षा नंतर त्यांच्या समर्थकांत उतरली. मैदानावर सामना सुरू असतानाच पाटाकडील तालमीचे काही समर्थक स्टेडियममधून बाहेर पडले आणि जवळच असलेल्या दिलबहार तालमीकडे गेले. हाताला लागतील ते दगड तसेच बिअरच्या बाटल्या त्यांनी तालीम परिसरातील दुचाकी वाहनांवर फेकल्या. वाहनांचे नुकसान केले. साईनाथ रिक्षा मित्रमंडळाचा फलक तसेच कमान वाकविली. त्यावर दगडफेक केली. यावेळी ‘दिलबहार’चे समर्थक आत सामना बघण्यात गुंगले होते. दगडफेक झाल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी दिलबहार तालमीकडे धाव घेतली. दोन्ही समर्थक समोरासमोर आल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आणि ‘पाटाकडील’च्या समर्थकांना तेथून हाकलले. ‘दिलबहार’च्या समर्थकांची संख्या वाढू लागली तसा तणावही वाढला. सामना संपताच पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या समर्थकांना पांगवायला सुरुवात केली; पण दिलबहारचे समर्थक टेंबे रोडने केशवराव भोसले नाट्यगृह व पुढे खासबाग रिक्षा स्टॉपपर्यंत दगडफे क तसेच हुल्लडबाजी करीत गेले. नाट्यगृहासमोर एका चारचाकी वाहनावर दगडफेक केल्याने त्याच्या काचा फुटल्या. विशेष म्हणजे यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाला होता.त्यामुळे कोण काय करीत आहे हे कळत नव्हते. दगडांचे आणि बाटल्यांचे आवाज कानांवर पडत होते. जमाव अचानक दगडफेक करीत असल्याचे पाहून टेंबे रोड, नाट्यगृह परिसरातील दुकाने बंद झाली. खाऊगल्लीतील हातगाडी, टपरीचालकांनी आपले व्यवसाय बंद केले. खाऊगल्लीत असणारे नागरिकही भीतीने वाट दिसेल त्या दिशेने धावू लागले. अंधार असल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते. शेवटी पोलिसांनी या परिसरातही लाठीमार करून हुल्लडबाज तरुणांना पळवून लावले. दोन्ही बाजंूच्या समर्थकांनी बिअरच्या बाटल्यांचाही वापर केल्याचे रस्त्यावर पडलेल्या काचांवरून दिसून आले. दिलबहारचे समर्थक खासबागपर्यंत गेल्याचे कळताच पुन्हा पाटाकडीलच्या समर्थकांनी दिलबहारच्या दिशेने दगडफेक करीत धाव घेतली; पण पोलिसांनी त्यांनाही तेथून पिटाळले. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. त्यादरम्यान कमालीचा तणाव परिसरातील नागरिकांनी अनुभवला. या भागातील वाहतूकही विस्कळीत झाली होती. नंतर जादा पोलीस कुमक मागविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही तालमींच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. खेळाडूंमुळेच लागले गालबोट...दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ यांच्यामध्ये झालेल्या सामन्यादरम्यान ‘पीटीएम’चा खेळाडू दीपक थोरातने दिलबहार तालमीच्या समर्थकांना चिथावणी दिली. यावेळी काही प्रेक्षकांनी त्याच्या अंगावर पाण्याची बाटली फेकली. ‘पीटीएम’च्या अन्य खेळाडूंनी मैदानातून प्रेक्षकांच्या अंगावर बाटल्या व दगड फेकण्यास सुरुवात केली. यावेळी पीटीएम समर्थकांनी प्रेक्षक गॅलरीतून काही हुल्लडबाजांनी थेट मैदानात उडी घेत दिलबहारच्या समर्थकांच्या गॅलरीकडे कूच केली. त्यांनाही दिलबहार समर्थकांनी चिथावणी देत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भरीस भर म्हणून काही अतिउत्साही समर्थकांनी मैदानावरील झेंडे हातामध्ये घेऊन प्रेक्षक गॅलरीत भिरकावले. यावेळी पोलिसांनी लाठीमार करत हुल्लडबाज समर्थकांना मैदानाबाहेर काढले. यावेळी ‘पीटीएम’च्या हुल्लडबाज समर्थकांनी दिलबहार समर्थकांना थेट मैदानाबाहेर येण्याचे आव्हान दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी दोन्ही संघांतील संघव्यवस्थापकांनी सामना पुन्हा सुरू केला. मात्र, सामना संपताच ‘पीटीएम’चे काही खेळाडू पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत थेट त्यांच्या अंगावर धावून गेल्याने पुन्हा एकदा मैदानात तणाव निर्माण झाला. मात्र, खेळाडूंच्यामुळेच आजच्या सामन्याला गालबोट लागल्याची चर्चा प्रेक्षकांमधून होत होती. बैठक घेऊन प्रकरण मिटवूदोन्ही तालमीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयितांची उचलबांगडी करण्यास सुरुवात केली. यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर बैठक घेऊन प्रकरण मिटवून टाकले पाहिजे, अशी चर्चा ते आपापसांत करत होते. ‘पाटाकडील’सह ‘दिलबहार’च्या ६० समर्थकांवर गुन्हा; पंधरा ताब्यातशाहू स्टेडियमवर फुटबॉल सामन्यादरम्यान दिलबहार तालीम आणि पाटाकडील तालीम यांच्यात झालेल्या हाणामारी व तोडफोडप्रकरणी दोन्ही तालमीच्या सुमारे ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रात्री उशिरा दहा ते पंधरा जणांना ताब्यात घेतल्याचे समजते. पाटाकडील तालमीच्यावतीने रूपेश किशोर सुर्वे (वय २६, रा. टेंबे रोड) याने २० तर ‘दिलबहार’च्या वतीने सचिन श्रीपती पाटील याने ४० समर्थकांच्या विरोधात फिर्याद दिली. फिर्याद देताना दोन्ही बाजूंचे समर्थक आमने-सामने पुन्हा आल्यानंतर जुना राजवाडा पोलीस स्थानक परिसरातही काही काळ तणाव निर्माण झाला. या प्रकरणी रात्री उशिरा दोन्ही तालमीच्या समर्थकांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या. पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते थांबून होते तसेच दोन्ही तालीम परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.‘दिलबहार’ खेळाडूचे दुकान फोडलेसायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास महाद्वार रोडवर काही हुल्लडबाज तरुणांनी धिंगाणा घातल्याने त्या परिसरातील दुकानेही काही काळ बंद होती. दिलबहार तालीम मंडळाच्या खेळाडू सचिन पाटील यांचे महाद्वार चौकात ‘महालक्ष्मी कापड दुकान’ आहे. या दुकानावर ५० हून अधिक तरुणांच्या जमावाने हल्ला केला. आधी या दुकानावर दगडफेक केली नंतर जमाव आत घुसला आणि दुकानाचे कौंटर, आतील कपडे विस्कटले नंतर देवकर पाणंद येथील घरावरही या जमावाने चाल केली. या जमावावर कोणाचेही नियंत्रण नव्हते,विशेष म्हणजे पोलीसही तेथे नव्हते. ‘पाटाकडील’चा रडीचा डाव सामन्यात पराभव झाल्याचा धक्का सहन न झाल्याने ‘पाटाकडील’चे समर्थक बेभान झाले होते. ज्या पद्धतीने दीपक थोरात या खेळाडूने तसेच त्यांचे समर्थक मैदानावर उतरून दिलबहार समर्थकांवर दगडफेक केली ते पाहता राडा होण्यास ‘पाटाकडील’चे समर्थकच अधिक कारणीभूत ठरले. पाटाकडील तालीम संघातील खेळाडू जसे मैदानावर रडीचा डाव खेळले तसा तो त्यांच्या समर्थकांनी मैदानाबाहेरही खेळला. त्यांच्यामुळे सामान्य कोल्हापूरकरांना मात्र वेठीस धरले. प्रचंड घबराट अन् धावपळप्रायव्हेट हायस्कू लच्या मैदानावर भगिनी महोत्सव सुरू असल्याने तेथे आबालवृद्धांची मोठी गर्दी उसळली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बरीच वाहने लागली होती.सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी एक जमाव खासबाग रिक्षा स्टॉपकडून, तर दुसरा जमाव टेंबे रोडने आला. प्रायव्हेट हायस्कूलसमोर दोन्ही गट समोरासमोर आले आणि एकमेकांवर दगडफेक सुरू झाली.अंधारात कोठून दगड पडत आहेत हे कळत नव्हते, त्यामुळे महोत्सवास आलेले लोक भयभीत झाले. प्रायव्हेट हायस्कूलचे फाटक बंद करण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. खाऊगल्लीत आलेल्या खवय्यांचीही अशीच धावपळ उडाली.