जनजागृती सप्ताहाची सुरुवात उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त संदीप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्षयरोग मायक्रोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसिस या जीवाणूचा शोध लावणारे शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांचे प्रतिमा पूजनाने झाली. शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी प्रास्ताविक केले.
मिरजकर तिकटी चौकात स्वाक्षरी अभियान, सेल्फी विथ मास्क आणि रिक्षा व बस चालक, पोलीस कर्मचारी यांना मास्क वाटप करण्यात आले. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे क्षयरोग जनजागृती होर्डिंगचे अनावरण, स्वाक्षरी अभियान, मास्क वाटप उपक्रम राबविण्यात आले.
खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यासाठी सी.एम.ई.चे आयोजन आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. अविनाश जाधव, निरो रोग तज्ज्ञ डॉ. अजय केणी ॲस्टर आधारचे डॉ. मिलिंद उबाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पीपीएम समन्वयक सुशांत कांबळे यांनी केले, तर किर्ती घाटगे यांनी आभार मानले.