कोल्हापूर : रेड वेलवेट केक, फाऊंडन्ट केक, डॉल केक, वेडिंग डबल लेअर केक, बास्केट फ्रूट केक...! अहाहा ही नावं ऐकली तरी तोंडाला पाणी सुटते ना... हे केक विकत आणण्यापेक्षा घरीच बनवता आले तर... आहे की नाही यम्मी कल्पना. ही कल्पना प्रत्यक्षात आणत लोकमत सखी मंच व उज्ज्वला कुकिंग क्लासतर्फे मंगळवारी (दि. १२) इचलकरंजीतील महिलांसाठी केक वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला इचलकरंजीतील एक वादळ बहुद्देशीय सेवाभावी संस्था, प्रेरित ध्रुवती महिला मंडळ व श्री महालक्ष्मी इसेन्स मार्ट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. इचलकरंजीतील श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत होणाऱ्या या केक वर्कशॉपमध्ये पाककला तज्ज्ञ उज्ज्वला भोसले या जेल केक, टायगर प्रिंट केक, मिरर केक, रोझ हनी केक असे दहा प्रकारचे केक शिकवणार आहेत. यावेळी महिलांना प्रिंटेड नोट्स, वेलकम ड्रिंक आणि दुपारचे जेवण, तयार केक बॉक्स, प्रमाणपत्र व श्री महालक्ष्मी इसेन्स मार्टकडून हमखास गिफ्ट देण्यात येणार आहे.
या वर्कशॅापमध्ये सहभागी होण्यासाठी सखी मंच सभासदांसाठी १ हजार रुपये व अन्य महिलांसाठी १ हजार ५०० रुपये फी आकारण्यात आली आहे. नावनोंदणीसाठी ८३२९५७२६२८, ९६३७३३०७०० या क्रमांकावर संपर्क साधावा.
--