शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

पर्यटकांना खुणावत आहे धामोड परिसरातील तुळशी जलाशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 10:52 AM

dam tourism Kolhapur-राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या निसर्गरम्य परिसरातील व कोल्हापुर-राधानगरी रोडवरील आमजाई व्हरवडे पासून दहा किलोमीटर अंतरावर साकारलेली तुळशी जलाशय धामोड परिसरातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपास येत असून पर्यटकांना खुणावू लागले आहे.

ठळक मुद्देपर्यटकांना खुणावत आहे धामोड परिसरातील तुळशी जलाशयपर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू, गाव पर्यटनाच्या नकाशावर

श्रीकांत ऱ्हायकरधामोड-राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या निसर्गरम्य परिसरातील व कोल्हापुर-राधानगरी रोडवरील आमजाई व्हरवडे पासून दहा किलोमीटर अंतरावर साकारलेली तुळशी जलाशय धामोड परिसरातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपास येत असून पर्यटकांना खुणावू लागले आहे.

मुख्य रस्त्यालगतच असणारे विस्तीर्ण तुळशी धरण व त्याचबरोबर गावातील प्राचीन मंदिरे, मनमोहक डोंगर, केळोशी खुर्द येथील वनराई, ऐतिहासिक किलचा ,येथील सांस्कृतिक परंपरा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू पाहत आहे. या स्थळांना पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज आहे. तसे झाल्यास हे गाव पर्यटनाच्या नकाशावर येऊ शकेल.राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेकडील निसर्गसंपन्न व भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन १९६५ साली तुळशी धरणाचा पाया घालण्यात आला व तेरा वर्षानंतर १९७८ साली तुळशी धरण पूर्णत्वाला गेले. पाण्याची मुबलक उपलब्धता झाल्याने परिसरातील जमिनीवर उसाचे मळे डोलू लागले. परिणामी आर्थिक स्थिती सुधारल्याने धामोड परिसरातील दरडोई उत्पन्नाचा आलेख वाढू लागला आहे . दुसरीकडे गेल्या दहा वर्षात येथील तुळशी जलाशयाची ओळख देखील विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर पिकनिक पॉईंट म्हणून वाढत आहे . त्यामुळे धरण पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे .तुळशी धरणावरून दिसणारे सूर्यास्ताचे अनोखे दर्शन, समोरचा ऐतिहासिक किलचा, तुळशी धरणाच्या पश्चिम बाजूस असणारा लोंढा नाला प्रकल्प, तुळशी धरण काठावरील ज्योतिर्लिंगाचे जागृत देवस्थान, तलावाच्या पायथ्याशी असलेले हनुमान मंदिर अशी अनेक ठिकाणे येथे पाहण्यासारखी आहेत. पावसाळ्याच्या दिवसात इथे कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे डोंगररांगातून अनेक नद्या व धबधबे कोसळतात. हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसातही पर्यटकांची संख्या उल्लेखनीय असते.डोंगर माथ्यावरून तुळशी नदीचा झालेला उगम, येथील निसर्ग रम्य परिसर, थंड हवा, डोंगर, दऱ्यामधून भ्रमंती, वनराईने नटलेला परिसर पर्यटकांना नेहमीच खुणावत असल्याने पर्यटकांची ओढा वाढू लागली आहे. शनिवार व रविवारी या सुट्टीच्या दिवशी तुळशी धरण परिसर पर्यटकांनी हाऊसफुल असतो. शाळेच्या पिकनिक व सहल यांची नेहमीच रेलचेल सुरू असते, मात्र पर्यटनदृष्ट्या हा परिसर अद्यापही दुर्लक्षितच आहे .तुळशी हे निसर्गरम्य ठिकाणे आहे.येथे सतत पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळे तुळशी पर्यटनाच्या नकाशावर येण्यासाठी लोकप्रतिनिधींनीच लक्ष देणे गरजेचे आहे.-दीपक भामटेकर,स्थानिक नागरिक, धामोडधामोड (ता. राधानगरी ) येथील तुळशी धरणाचा संग्रहित फोटो व धरणावर साकारत असलेली फुलबाग 

टॅग्स :dam tourismधरण पर्यटनkolhapurकोल्हापूर