कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले लोक गावभर फिरत असल्यामुळे संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाच्या वतीने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी स्वॅब टेस्ट मोहीम राबवण्यात येत असली तरी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले नागरिक या तपासणीला सहकार्य करीत नाहीत. किंबहुना तपासणी करून घेण्यालाच ते तयार होत नसल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला पोलिसांचा आधार घ्यावा लागत आहे आणि अनेकांकडून दक्षतेचे नियमच पाळले जात नसल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून हळदी (ता. करवीर) येथील बाजारपेठ खुली झाली असून बाजारपेठेत शारीरिक अंतर, मास्कचा नियमितपणे वापर आणि कोरोनाच्या बाबतीतील शासनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्यांवर करवीर पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यानेे कोरोनाचा उद्रेेेेेक सुरू झाला असून कोणाचीच जरब राहिली नसल्याने ग्रामस्थांनीच आता दक्षता घेऊन वाढत्या कोरोनाला आवर घालण्याची गरज आहे. सोमवार (दि. १२) पर्यंत ७ असलेली रुग्णसंख्या मंगळवारी २० झाली असून, गाव सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.
..........................................
माझ्या सॅमसंग गेलेक्सी स्मार्टफोनवरून पाठवले.