अशोक खाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककुंभोज : पेठवडगावच्या पूर्वेस अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वसलेल्या (मिणचे) सावर्डे गावात शेतीपूरक व्यवसायाबरोबरच कोणी उदरनिवार्हाचे साधन म्हणून तर कोणी अधिक अर्थार्जनासाठी व्यापारास प्राधान्य दिले. प्रामुख्याने इथल्या मुस्लिम समाजात तर बारदान व्यवसाय घराघरांत स्थिरावला आहे. पिढ्यान्पिढ्या सुरू असलेल्या या व्यवसायाबरोबरच हळदीच्या खात्रीशीर बियाण्यांच्या खरेदी-विक्रीतही येथील व्यावसायिकांनी सर्वदूर नावलौकिक केला आहे. जनावरे, कडधान्ये, सोयाबीन, करंज्या, एरंड खरेदी-विक्री व्यवसायाचीही अनेकांनी कास धरल्याने संपूर्ण गावाची ओळख जणू व्यापाºयांचे गाव अशी बनली आहे.दहा हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या सावर्डे गावची नागरी वस्ती जवळपास गावठाणाइतकीच शेती कामाच्या सोयीसाठी मळेभागात विखुरली आहे. गावात अंदाजे पंचवीस टक्के मोठे शेतकरी, तर उर्वरितांच्या सातबारापत्रकी अल्प शेती. पर्यायाने शेतमजुरीसह दुग्धव्यवसायाची कास धरत कमी गुंतवणुकीच्या छोट्या व्यवसायासह जनावरे विक्री (दलाली), बारदान खरेदी-विक्रीच्या पूर्वापार चालत आलेल्या व्यापाराद्वारे गावातील शेकडो कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.पूर्वापार चालत आलेल्या बारदान व्यवसायात उतरून गावातील शंभराहून अधिक मुस्लिम कुटुंबातील दोनशेवर तरुणांनी कुटुंबातील सदस्यांना घरबसल्या रोजगार उपलब्ध केला आहे. दररोज सकाळी खेडोपाडी फिरून सुतळी तसेच प्लास्टिक पोती गोळा करणे, गोळा झालेल्या पोत्यांची वर्गवारी करणे, फाटलेल्या पोत्यांना ठिगळे लावून ती मोठ्या व्यापाºयांना विकणे असा या व्यावसायिकांचा नित्यक्रम बनला आहे. प्लास्टिक पोती, मल्छिंगचा टाकाऊ कागद इचलकरंजीला पुनर्वापरासाठी विकले जाते. झाकीर मुल्ला, युनूस मोमीन, आनंदा चव्हाण, ईलाई मोमीन, बशीर मोमीन, जावेद मोमीन, हिदायतुल्ला मोमीन, भैया मुजावर, इरफान मोमीन, इरशाद मोमीन, रमजान मोमीनसज्जाद मोमीन, बाबू शेख, आदी हा व्यवसाय निष्ठेने करीत असून, चांगला जमही बसविला आहे.सुरुवातीस किरकोळ प्रमाणात चालणाºया हळदीच्या बियाणे विक्री व्यवसायाची उलाढाल अलीकडे वाढली असून, या धंद्यातील व्यापाºयांची संख्या आता वीसवर पोहोचली आहे. पस्तीस वर्षांपूर्वी खुतबुद्दीन मोमीन, कमरुद्दीन मोमीन यांनी आंध्र प्रदेशातून रेल्वेने हळदीचे बियाणे आणून व्यापार सुरूकेला. हनीफ मोमीन, गणी मोमीन, यासीन मुल्ला यांच्याकडून गावातील काहीजणांनी या व्यापाराचे धडे घेतले. माजी पं. स सदस्य कलंदर मकानदार, सुशांत पाटील, अजित देसाई, अमीरशहा मुल्ला, दीपक चव्हाण, बालाजी ग्रुप, राजू देसाई, शिवाजी पाटील, पोपट पाटील या प्रमुख हळद व्यापाºयांनी तमिळनाडूतील हळद उत्पादक शेतकºयांपासून सांगलीच्या वसंतदादा मार्केटसह संपूर्ण सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हळद लागवड करणाºया शेतकºयांत उत्कृष्ट आणि स्वस्त बियाणांचा ब्रँड बनविल्याने सावर्डेतील हळदीच्या बियाणांना संपूर्ण सांगली व सातारा जिल्ह्यातून मागणी वाढत आहे. पाऊसमानावर हळद धंद्याची तेजीमंदी अवलंबून असल्याने ठरावीक व्यापारीच हा व्यवसाय नियमितपणे करतात. अनेकजण तेजीमंदीचा कानोसा घेत कुवतीप्रमाणे गुंतवणूक करतात. दर , घटतुटीच्या कात्रीत हा धंदा जोखीम पत्करून करावा लागत असल्याने अनेकांचे हात शेकले आहेत; तर काहींनी चांगला जमही बसविला आहे. बारदान, हळदीचे उत्तम बियाणे मिळणारे गाव म्हणून सावर्डेची ओळख निर्माण झाली आहे. अल्पशिक्षित, सुशिक्षित बेरोजगारांना एमआयडीसी, शरद साखर कारखाना, परिसरातील सूतगिरणीत रोजगार उपलब्ध झाल्याने गाव स्वयंपूर्ण बनण्यास हातभार लागला आहे.पोत्यांचे आगार........गावात बारदान व्यवसाय करणाºयांची संख्या दोनशेच्या घरात आहे. दररोज हजारात पोती जमा होत असून, ती लागलीच मोठ्या व्यापाºयांना विकली जात असल्याने पोत्यांची मोठी आवक-जावक होते. बिनहुकाची पोती धान्य भरण्यासाठी, तर हूक लागलेल्या पोत्यांना ब्रिकेट भरण्यासाठी मोठी मागणी आहे.सेंट्रिंग काँन्ट्रँक्टरांचे गाव...व्यापाराबरोबरच गावात सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टरांची संख्याही मोठी आहे. प्रवीण खाडे, तानाजी मोरे, रमेश चव्हाण, रमेश देसाई, संजय कोरवी यांच्यासह आणखीन काहीजण हा व्यवसाय करतात. या व्यवसायातून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
हळद बियाणे, बारदानांत ‘खात्रीशीर’ सावर्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 12:10 AM