शहरं
Join us  
Trending Stories
1
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
2
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
3
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
4
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
5
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
6
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
7
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
8
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
9
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
11
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
12
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
13
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
14
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
15
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
16
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
17
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
18
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
19
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
20
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

पाच दिवसांत ३५ लाखांची उलाढाल

By admin | Published: February 09, 2015 12:16 AM

ताराराणी महोत्सव : तांदूळ खरेदीसाठी उड्या

कोल्हापूर : नाशिकचे मांडे... भाजी-भाकरी... मांसाहारी जेवणाची लज्जत चाखण्यासाठी स्टॉलवर लागलेली गर्दी; तर तांदूळ व मासळी खरेदीसाठी ग्राहकांच्या पडलेल्या उड्या... हे चित्र होते ताराराणी महोत्सवाचे! रविवारी पाचव्या दिवशी या महोत्सवात विविध वस्तूंच्या खरेदीच्या माध्यमातून सुमारे १० लाखांची उलाढाल झाली. आतापर्यंत ३५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने विभागीय पातळीवरील ‘ताराराणी महोत्सव २०१५’ प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर सुरू आहे. रविवारी, पाचव्या दिवशी तुडुंब गर्दी झाली. आतापर्यंत तब्बल ३५ लाखांची उलाढाल झाली. यामध्ये रविवारी सुटीच्या दिवशी झालेल्या तुडुंब गर्दीमुळे उलाढाल १० लाखांच्या घरात पोहोचली. शहरासह ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेटी देऊन प्रदर्शनाची पाहणी करीत होते. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दीड हजारांहून अधिक महिलांनी भेट दिली.शहर, उपनगरांसह परगावचे लोकही प्रदर्शनाला भेट देत आहेत. १० फेब्रुवारीपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे.बचत गटांच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अधिक गर्दी होती. नागरिक कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्या रश्श्यावर ताव मारताना दिसत होते. त्याशिवाय भाजी-भाकरी, खर्डा-भाकरी, वडा-पाव, मिसळ अशा खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील गर्दीही हटत नव्हती. त्याशिवाय बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ घेण्यासाठी नागरिकांच्या उड्या पडत होत्या. यामध्ये तांदूळ व मासळी यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सुटीचा दिवस असल्याने झालेल्या गर्दीने तांदूळ व मासळी सकाळच्या टप्प्यातच संपली. त्यामुळे तांदूळ व मासळी पुन्हा मागविण्यात आली. महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कलाकारांनी लावणी नृत्याचे आविष्कार सादर केले. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या ताराराणी महोत्सवातील बचत गटांच्या प्रदर्शनात रविवारी नाशिक येथील महिला बचत गटाच्या महिला मांडे व पुरणपोळी करताना पाहण्यासाठी झालेली गर्दी.