अर्जुनवाड : शिरटी (ता. शिरोळ) येथील शिरटी-शिरोळ मार्गावर असलेल्या राजकुमार कोगनोळे यांच्या शेतीलगत मोठे कासव आढळले. याचे वजन ४० किलो आहे. कासव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.याबाबतची माहिती मिळताच प्राणीमित्र रोहित कांबळे, तुषार कांबळे, प्रतिक कांबळे यांनी तात्काळ कासवाला ताब्यात घेऊन वनविभागाच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
बुधवारी रात्री कासव रस्त्यावर पडले होते. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. यावेळी नागरिकांनी तात्काळ येथील प्राणीमित्र रोहित कांबळे यांच्यासह पथकाला बोलावून घेतले. त्यांनी व्यवस्थित कासवाला ताब्यात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन रेस्क्यू सोसायटीमार्फत वनविभागाच्या ताब्यात दिले.