कोल्हापूर : पोस्टल मतदानाच्या मोजणीसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांकरिता १२ साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, दोन्ही मतदारसंघांत २४० टेबल रविवारी मांडण्यात आले.लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. २३) होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे अतिरिक्तमुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे आढावा घेतला.यावेळी कोल्हापूर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई व हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी तयारीची माहिती दिली.कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे व हातकणंगले मतदारसंघाची राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथे होणार आहे. प्रत्येक विधानसभेसाठी २० टेबल याप्रमाणे दोन्ही मतदारसंघाचे २४० टेबल मतमोजणी केंद्रात मांडण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी कर्मचाºयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना दोन प्रशिक्षणही देण्यात आले आहेत.त्याचबरोबर पोस्टल मतदान प्रक्रिया लवकर होण्यासाठी दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी दोनऐवजी प्रत्येकी सहा अधिकाºयांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी जिल्हा निवडणूक आयोगाला पाठविला होता. त्याला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली; त्यामुळे टपाल मतमोजणीची प्रक्रिया लवकर संपेल, असा अंदाज निवडणूक विभागाचा आहे.सैनिक मतदारसाठी अधिकारी वाढवलेसैनिक मतदारांच्या पोस्टल मतमोजणीसाठी कोल्हापूर मतदारसंघाकरिता तीन व हातकणंगले मतदारसंघाकरिता तीन साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमकडून सैनिकांच्या मतपत्रिकांवरील ‘क्युआर’ या बारकोडची छाननी केली जाणार आहे. १0 टेबलमागे एक साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे.टपाली मतपत्रिकांसाठी १२ टेबलटपाली मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी कोल्हापूर मतदारसंघासाठी सहा व हातकणंगले मतदारसंघासाठी सहा टेबलचे नियोजन करण्यात आले आहे. विधानसभानिहाय प्रत्येक टेबलला एक साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, एक मतमोजणी साहाय्यक, एक मतमोजणी पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘पोस्टल’साठी १२ अधिकाऱ्यांची टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:35 AM