शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

बारावी परीक्षेस यंदा सव्वा लाख विद्यार्थी

By admin | Published: February 19, 2015 12:15 AM

शनिवारपासून प्रारंभ : भरारी पथकांची राहणार करडी नजर

कोल्हापूर : शासनाच्या नव्या सूचनांनुसार बारावीच्या परीक्षेची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने तयारी पूर्ण केली आहे. यावर्षी १ लाख २३ हजार ७९३ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. शनिवारी (दि. २१) मराठीच्या पेपरने परीक्षेला प्रारंभ होईल. विभागातील १३५ परीक्षा केंद्रे त्यासाठी सज्ज झाली आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांना जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण १३४ परीक्षा केंद्रांवर जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था केली आहे. ‘कॉपीमुक्त’ परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात सात भरारी पथके कार्यरत असणार आहेत. कोल्हापूर शहरात ११ परीक्षा केंद्रे आहेत. विभागातून एकूण ३ हजार २२५ हे खासगी विद्यार्थी (१७ क्रमांकाचा अर्ज भरलेले) आणि ६ हजार ८०१ इतके पुनर्परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. दरम्यान, महाविद्यालयांमध्ये २ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या प्रात्यक्षिक परीक्षा बुधवारी संपल्या. पूर्वतयारी, प्रवेशपत्रांच्या वितरणाची महाविद्यालयांमध्ये लगबग सुरू आहे. तीन दिवसांनी पहिला पेपर असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यासात गुंतल्या आहेत. (प्रतिनिधी)परीक्षा केंद्रे अशी...जिल्हापरीक्षा केंद्रे विद्यार्थी (हजारांत)कोल्हापूर५३४२२२६सांगली४०३६१६१सातारा४२३८६०५विद्यार्थी...शाखा विद्यार्थीविज्ञान ४८१९६कला ४३८५०वाणिज्य २४१५३एमसीव्हीसी ६२३४यावर्षी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचन, आकलन करण्यासाठी दिली जाणार आहे. परीक्षेबाबत कोल्हापूर विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आदींच्या संघटनांच्या बैठका घेतल्या आहेत. तसेच विजेची आणि पाण्याची व्यवस्था परीक्षा केंद्रांवर केली आहे. - शरद गोसावी, कोल्हापूर विभागीय सचिव,राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ