शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सत्तावीस प्राथमिक शाळा ‘अनधिकृत’

By admin | Published: June 10, 2015 12:49 AM

शिक्षण विभागाकडून यादी जाहीर : प्रवेश न घेण्याचे आवाहन; बंद करा, अन्यथा कारवाईचा इशारा

कोल्हापूर : जिल्ह्यातील तब्बल २७ प्राथमिक शाळा अनधिकृत असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने मंगळवारी प्रसिद्धिपत्रकातून जाहीर केले. या शाळांनी शासनाकडून परवानगी घेतलेली नाही. ‘अधिकृत’मध्ये सर्वाधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. संबंधित शाळेत पालकांनी पाल्याचा प्रवेश करू नये, असे आवाहन केले आहे. अनधिकृत शाळा बंद कराव्यात, अन्यथा कारवाई करणार, असेही म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात अनधिकृत शाळांचे पीक वाढले आहे. प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही; त्यामुळे दिवसेंदिवस अनधिकृत शाळांची संख्या वाढत आहे. इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल अधिक आहे. त्यामुळे इंग्रजी शाळा काढून पैसे कमविण्यासाठी राजकीय वरदहस्त असलेले अनेकजण सक्रिय आहेत. ‘बंद’ची कारवाई झाल्यास येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. अनधिकृत तालुकानिहाय शाळा अशा : गीताई इंग्लिश मीडियम स्कूल (सातवे, ता. पन्हाळा), डॉ. अमोल अनाथ मुलामुलींची निवासी मराठी शाळा (सोनवडे, ता. शाहूवाडी), कोरगांवकर इंग्लिश मीडियम स्कूल (सदर बाजार, कोल्हापूर), ज्ञानहो विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, (नाना पाटीलनगर, कोल्हापूर), आनंद इंग्लिश मीडियम स्कूल, नाना पाटीलनगर (कोल्हापूर), चाटे इंग्लिश मीडियम स्कूल (शुगर मिल, कसबा बावडा), दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल, कसबा बावडा, स्वामी विवेकानंद विद्यालय (तळंदगे, ता. हातकणंगले), सोनाली पब्लिक स्कूल (हातकणंगले), इंदिरा गांधी बालविकास मंदिर (हिंगणागाव, ता. हातकणंगले), सिल्म इंग्लिश मीडियम स्कूल (हुपरी, ता. हातकणंगले), यश सेमी-इंग्रजी स्कूल (वडगाव, ता. हातकणंगले), श्री. पंडितराव खोपकर इंग्लिश मीडियम स्कूल (सावरवाडी, ता. करवीर), ख्रिस्तोफर जोसेफ जॉन्सन यांच्या गायडिस्ट शिक्षण संस्थेची वाघजाई ग्रीन व्हील्स इंग्रजी स्कूल (कोपार्डे, ता. करवीर), जीवनदीप एन्टायर अ‍ॅण्ड सेमी-इंग्रजी मीडियम स्कूल (कोपार्डे फाटा, ता. करवीर), बळवंतराव कोरे इंग्लिश मीडियम स्कूल (गडमुडशिंगी, ता. करवीर), विद्याभवन इंग्लिश मीडियम स्कूल (उजळाईवाडी, ता. करवीर), गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, (गडमुडशिंगी ता. करवीर), ज्ञानकला विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल (उचगाव, ता. करवीर), ओमसाई निवासी शाळा (पीरवाडी, ता. करवीर), मालू इंग्लिश मीडियम स्कूल (जयसिंगपूर, ता. शिरोळ), दत्त प्राथमिक विद्यामंदिर (मराठी) (नृसिंहवाडी, ता. शिरोळ), दत्त बालक मंदिर - मराठी (शिरोळ), आर्मी पब्लिक स्कूल (शिरोळ), जान्हवी इंग्लिश मीडियम स्कूल (गणेशवाडी, ता. शिरोळ), आर्मी पब्लिक स्कूल (कवठेगुलंद, ता. शिरोळ), फाउंडेशन (कवठेगुलंद, ता. शिरोळ). कारवाई होणारअनधिकृत म्हणून जाहीर केलेल्यांत शिरोळ तालुक्यातील सात, करवीरमधील आठ, कोल्हापूर शहरातील पाच आणि हातकणंगलेमधील पाच शाळा आहेत. शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांतील प्रत्येकी एक शाळा आहे. अनधिकृत शाळा संबंधित चालकांनी बंद कराव्यात, अन्यथा ‘बालकांचे मोफत आणि हक्काचे शिक्षण कायद्यां’तर्गत कारवाई करण्यात येणार आहे.