पंचगंगा स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेणी, लाकूड फाटा गरज आहे. याची जाणीव ठेवून अरिहंत पार्क मित्र मंडळ व नीलेश पाटील प्रेमी ग्रुपने शेणी व लाकूड साठ्यासोबत ५० पीपीई किट, ५० हँड ग्लोज, ५० सॅनिटायझर आणि कर्मचाऱ्यांना ५० मास्क देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, नीलेश पाटील, प्रशांत गायकवाड, यश नीलेश पाटील, पंकज कराळे, राहुल रजपूत, प्रवीण पाटील, अभिजित नागांवकर, आदी उपस्थित होते.
फोटो : १७०५२०२१-कोल-अरिहंत
आेळी : पंचगंगा स्मशानभूमीस अरिहंत पार्क मित्र मंडळ व नीलेश पाटील प्रेमी ग्रुपतर्फे शेणीदानसह विविध उपयोगी साहित्य देण्यात आले.
ऐश्वर्या पाटील यांच्यातर्फे गरजूंना अन्नदान
कोल्हापूर : मूळच्या डोंबिवलीच्या, पण कामानिमित्त कोल्हापुरात आलेल्या ऐश्वर्या नीलेश पाटील यांनी रविवारी रात्री लाॅकडाऊनमुळे भुकेलेले फिरस्ते गरजू नागरिकांना ५०० पाकिटे अन्नदान करण्यात आले.
लाॅकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक व मार्केट यार्ड, कावळा नाका, परिसरातील गरजू , सुरक्षा रक्षक व फिरस्त्यांना रविवारी रात्री पाटील यांनी सेवा निलायम संस्थेच्या मदतीने जेवणाची पाकिटे पोहोचविली. यावेळी ऐश्वर्या मुनीश्वर, रंजना स्वामी, प्रतापसिंह घोरपडे, मिलिंद काटकर, ॲड. जयराज घोरपडे, अजय लोंढे व संस्थेचे स्वयंसेवक उपस्थित होते. फोटो : १७०५२०२१-कोल-पाटील
आेळी : सेवा निलायमच्या माध्यमातून डोंबिवलीच्या ऐश्वर्या पाटील यांनी रविवारी रात्री रेल्वे स्टेशनसह शहरातील गरजू नागरिकांना पाचशे पाकिटे अन्नदान करण्यात आले.
मधुकर येवलुजे तर्फे १० कुटुंबांना मायेचा हात
कोल्हापूर : मराठा महासंघ कागल तालुका संघटक मधुकर येवलुजे यांच्यातर्फे शाहूनगरातील लाॅकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या दहा कुटुंबीयांना पंधरा दिवस पुरेल असे अन्नधान्यासह वस्तूंचा पुरवठा केला. यामध्ये तेल, साखर, तूरडाळ, पोहे, साबण, बटाटा, आदी वस्तूंचा समावेश होता. विशेष म्हणजे येवलुजे हे पेट्रोल पंपावर कामाला आहेत. यावेळी महादेव पाटील, अवधूत पाटील, भारती पाटील, सारिका पाटील, ॲड. विजया पाटील, दीपक कांबळे, आदी उपस्थित होते.
फोटो : १७०५२०२१-कोल-मधुकर येवलुजे
मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेतर्फे अन्नदान
कोल्हापूर : मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेतर्फे गेल्या आठ दिवसांपासून गरजू लोकांसह पोलीस, केएमटी, महापालिका, अग्निशमन दलाचे जवान, आदींना जेवणाची पाकिटे वाटप केली जात आहेत. यासाठी शहराध्यक्ष प्रतीकसिंह काटकर, अमृता खोत, दिग्विजय काटकर, कोमल मोरे, पीयूष तेजवानी, हर्षवर्धन जाधव, चैतरेष जाधव, भालचंद्र बुवा, सोमेश जाधव, सिद्धी भाईशेटे, यशराज पोहाळकर, कौस्तुभ काटकर, यश सरनोबत, विराज पाटील, साद शेख, दर्शन काटकर, आदी विद्यार्थी उपस्थित होते.
फाेटो : १७०५२०२१-कोल-विद्यार्थी मराठा महासंघ
ओळी : मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेतर्फे पोलिसांसह कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना अन्नदान करण्यात आले.