रत्नागिरी : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील ५४ अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी सव्वातीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या वर्षभराच्या कालावधीत या अंगणवाड्यांना हक्काची इमारत मिळेल.जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी २८९५ अंगणवाड्या मंजूर असून, २८६५ अंगणवाड्या कार्यरत आहेत़ जिल्ह्यातील १४६५ अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत़ त्यामध्ये नियमित ८८३ व ५७९ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे़ त्यामुळे काही अंगणवाड्या खासगी इमारतीत, प्राथमिक शाळेच्या खोलीमध्ये, तर काही अंगणवाड्या समाजमंदिरात भरविण्यात येतात़ या अंगणवाड्यांसाठी जिल्हा नियोजन समितीची कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याची तयारी आहे़ मात्र, ग्रामीण भागात जागाच उपलब्ध होत नसल्याने इमारतींचा प्रश्न कायम आहे.सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेले रुपये तीन कोटी २४ लाख रुपये जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रत्येक अंगणवाडीसाठी सहा लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला असल्याने जिल्ह्यात ५४ अंगणवाड्यांना स्वमालकीची इमारत मिळेल. या कामांचे ई-टेंडरिंग करण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)मंजूर अंगणवाड्या - २८९५कार्यरत अंगणवाड्या - २८६५इमारती नसलेल्या - १४६५
अंगणवाड्यांसाठी सव्वातीन कोटी मंजूर
By admin | Published: April 14, 2017 11:12 PM