शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गजाआडच्या जगात निरागस हास्याचा किलबिलाट : कळंबा कारागृहातील माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:53 AM

कारागृह हा शब्द ऐकला, तरी उंच उंच दगडी भिंती, बरॅकला धरून उभे असलेले कैदी, जाळीच्या पलीकडून बोलणारे नातेवाईक आणि बंदिस्त जग डोळ्यासमोर येतं; पण या गजाआडच्या जगातही स्वच्छंदी जगणाऱ्या लहानग्या बाळाचे निरागस हास्य कैद्यांनाच नव्हे,

ठळक मुद्देमहिन्याकाठी पाचहून अधिक बालकांचे संगोपन

- इंदुमती गणेश ।कोल्हापूर : कारागृह हा शब्द ऐकला, तरी उंच उंच दगडी भिंती, बरॅकला धरून उभे असलेले कैदी, जाळीच्या पलीकडून बोलणारे नातेवाईक आणि बंदिस्त जग डोळ्यासमोर येतं; पण या गजाआडच्या जगातही स्वच्छंदी जगणाऱ्या लहानग्या बाळाचे निरागस हास्य कैद्यांनाच नव्हे, तर वर्दीआड दडलेल्या माणूसपणालाही साद देते. कळंबा कारागृहात शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील महिन्याकाठी किमान पाच ते सहा बालकांचे बालपण जपले जाते.

आयुष्याच्या एका वळणावर हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून व्यक्तीची रवानगी कारागृहात होते. आठ महिन्यांची गरोदर असताना एका महिलेसह तिच्या पतीवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आणि दोघेही कारागृहात आले. या महिलेने अडीच महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि कारागृहात मंगळवारी (दि. १) धुमधडाक्यात बारसं घालून या चिमुकलीला ‘दुर्गा’ हे नाव दिलं गेलं. कारागृह ही सुधारगृह व्हावी, या उद्देशाने कळंबा जेल प्रशासनाकडून कैद्यांसाठी शिक्षण, गळाभेट, अंबाबाईचा लाडू प्रसाद, रोजगार, प्रशिक्षण, असे विधायक उपक्रम राबविले जात आहेत; पण एका चिमुकलीचे बारसे होण्याची ही कारागृहाच्या इतिहासात पहिलीच वेळ होती. बालहक्क आणि कायद्यानुसार कोणत्याही मातेला तिच्या बाळापासून वेगळे करता येत नाही. मग ती महिला गुन्हेगार असली तरी. महिला कैदीसोबत कारागृहात तिची शून्य ते सहा वर्षांपर्यंतची बालके राहू शकतात. कळंबा कारागृहात सध्या ७० महिला कैदी आहेत. त्यातील एका महिलेला दोन व अन्य तिघींना एक-एक मूल आहे. काही दिवस किंवा एक-दोन वर्षांसाठी शिक्षा भोगण्यासाठी आलेल्या महिला कैदी मुलांसोबत राहतात आणि शिक्षेचा कालावधी संपला, की निघून जातात. अशारीतीने महिन्याला किमान पाच ते सहा महिला कैदी बालकांसमवेत कारागृहात येत-जात असतात.

खेळणीपासून अंगणवाडीपर्यंत..कारागृहात मातेची व नवजात शिशूची छान काळजी घेतली जाते. तिच्यासाठी स्वतंत्र खोली दिली जाते. मातेला सकस आहार, बालकाचे सुयोग्य संगोपन, औषधोपचार, अगदी खेळणीपर्यंतच्या सोयी-सुविधा पुरवल्या जातात. अनेकदा येथील महिला कर्मचाºयांची मुलेही या लहानग्यांसोबत छान रमतात. 

जन्माचे गुपितएखाद्या बालकाचा कारागृहात जन्म झाला, की आयुष्यभर त्याच्यावर ठपका बसतो. या ठपक्याखाली त्यांचे बालपण चिरडले जाऊ नये, यासाठी कारागृह प्रशासनाकडून बाळाच्या जन्मदाखल्यावर कारागृहाचा नामोल्लेखही केला जात नाही. ‘सीपीआर’सारख्या दवाखान्याचे नाव या जन्मदाखल्यावर असते.रवानगी ‘बालकल्याण’मध्येसहा वर्षांनंतर बालकांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव येत असते. आपण कारागृहात राहतोय, ही भावना त्यांच्या मनावर विपरीत परिणाम करणारी ठरू शकते; त्यामुळे सहा वर्षांनंतरच्या बालकांना पालकांच्या परवानगीने कैद्यांच्या कुटुंबीयांकडे किंवा बालकल्याण संकुलसारख्या संस्थांमध्ये पाठविले जाते. 

नवजात बालकांच्या संगोपनात पहिली सहा वर्षे खूप महत्त्वाची असतात; त्यामुळेच कारागृहात त्यांचे बालपण जपण्याचा प्रयत्न केला जातो. ही बालके येथे छान रमतात, महिला कर्मचाºयांच्या मुलांसोबत खेळतात, त्यांचे हे विश्व आम्हा सर्वांनाही आनंदून जाते.- शरद शेळके,अधीक्षक, कळंबा कारागृहकळंबा कारागृहात बालकांचे बालपण जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंग