कुरुंदवाड/कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार आणि १७ जण जखमी झाले. हे अपघात गुरुवारी पहाटे झाले. कुरुंदवाड-भैरववाडी-नांदणी मार्गावर गणेश बेकरीच्या कामगारांना घेवुन नांदणीच्या दिशेने जाणारी बस उलटून एका कामगाराचा मृत्यू झाला. काशीनाथ शशिकांत बेरड (वय २८ रा. नवे दानवाड) असे त्याचे नाव आहे. बसमध्ये एकुन ४0 कामगार प्रवास करत होते. या कामगारापैकी १५ महिला जखमी झाल्याआहेत. गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
बेकरीत वेळेत पोहोचावयाचे असल्याने चालक दत्ता बले (रा. नांदणी) हा बस भरधाव वेगाने हाकत होता. कुरुंदवाडीपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेला अरुंद पुल ओलांडताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कुरुंदवाड-नांदणी रस्त्यालगतच्या टोपले-पाटील यांच्या शेतात बस घुसली आणि उलटली.
या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेल्या काशीनाथ बेरड या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील १५ महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. एसटी बस रस्त्यातून बाजूला घेतली असून शिवशाही बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.