कोल्हापूर, दि. २६ : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात सरासरी १२.४0 मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात पडला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.भोगावती नदीपात्रात प्रतिसेंकंद ५0५६ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरु असून सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. १२ वाजून ५0 मिनिटांनी गेट क्रमांक ३ तर १ वाजून ५ मिनिटांनी गेट क्रमांक ६ उघडले गेले आहेत. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. यापूर्वी २४ आगॅस्ट २0१५ मध्ये अशीच स्थिती झाली होती.प्रतिसेकंद पाच हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरु झाला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
२४ तासात पडलेल्या पावसाची नोंद
हातकणंगले १.७५, पन्हाळा ७.२८, शाहूवाडी १७.८३ राधानगरी १६.८३, गगनबावडा ५0, करवीर ६.२७, कागल ६.१६, गडहिंग्लज २.७१, भुदरगड १६.६0, आजरा १४.७५ व चंदगडमध्ये ८.६७ मि.मी. अशी नोंद झाली आहे.काल दिवसभरात जिल्ह्यात १४८.८३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून जूनपासून आतापर्यंत एकूण १0४९६.९६ मि. मि. पाऊस झाला आहे.
जिल्हयातील धरण पाणीसाठा
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी ७ च्या नोंदीनुसार धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाºयांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे.
राधानगरी - ८.३५ (८.३६१ टी. एम. सी), तुळशी ३.४७ (३.४७१ टी. एम. सी), वारणा ३३.८८ (३४.३९९ टी. एम. सी), दुधगंगा २२.७१ (२५.३९३ टी. एम. सी), कासारी २.६८ (२.७७४ टी. एम. सी), कडवी २.५१ (पूर्ण भरले), कुंभी २.७0 (२.७१५ टी. एम. सी), पाटगाव ३.५२ टी. एम. सी (३.७१६ टी. एम. सी), चिकोत्रा 0.५८ (१.५२२ टी. एम. सी), चित्री १.८१ (१.८८६ टी. एम. सी), जंगमहट्टी १.२२ (पूर्ण भरले), घटप्रभा १.५६ (पूर्ण भरले), जांबरे 0.७९ (0.८२0 टी. एम. सी ) आणि कोदे ल. पा. 0.२१ (पूर्ण भरले).
पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाºयावरील पाणीपातळी १६ फूट ६ इंच, सुर्वे १८ फूट ४ इंच, रुई ४३ फूट ३ इंच, इचलकरंजी ४0 फूट, तेरवाड ३७ फूट , शिरोळ २९ फुट ३ इंच, नृसिंहवाडी २४ फूट ३ इंच इतकी आहे.