कोल्हापूर : गेली पंचवीस वर्षे फरारी असलेल्या दोघा भावांना करवीर पोलीस उपअधीक्षकांच्या तपास पथकाने पाळत ठेवून अटक केली. बबन रामचंद्र माने (वय ४२, रा. ७१४, ए वॉर्ड, कोल्हापूर. सध्या रा. भीमनगर, पेठनाका, सांगली) व शंकर रामचंद्र माने (५२, रा. बेघर गल्ली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट नं. ६) ए. एस. गंजवटे यांच्या न्यायालयाकडून प्राप्त स्टॅंडिंग वॉरंटमधील गेल्या २५ वर्षांपासून फरारी असलेले आरोपी बबन माने व शंकर माने यांची गोपनीय माहिती पोलिसांनी काढली. ते दोघे शेतमजुरीचे काम करत होते. या आरोपीच्या हालचालींवर पाळत ठेवून त्यांना गुरुवारी ताब्यात घेतले. त्यांना जुना राजवाडा पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी सुपूर्त केले.
जिल्ह्यातील स्टॅंडिंग वॉरंटमधील आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडून न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी दिले होते. त्याबाबत करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्याकडील तपास पथकाने या दोघा आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.
फोटो नं. १००६२०२१-कोल-बबन माने (आरोपी)
फोटो नं. १००६२०२१-कोल-शंकर माने (आरोपी)
===Photopath===
100621\10kol_1_10062021_5.jpg~100621\10kol_2_10062021_5.jpg
===Caption===
फोटो नं. १००६२०२१-कोल-बबन माने (आरोपी)फोटो नं. १००६२०२१-कोल-शंकर माने (आरोपी)~फोटो नं. १००६२०२१-कोल-बबन माने (आरोपी)फोटो नं. १००६२०२१-कोल-शंकर माने (आरोपी)