कोल्हापूर : कागल तालुक्यातील हसूर बुद्रुक येथे शेतातील माती उचलण्यास सांगितल्याच्या रागातून बेदम मारहाण करून केरबा धोंडिबा बोटे (वय ५५) यांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.के. गुडधे यांनी दोघा भावांना आजन्म कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सात्तापा पुंडलिक नरतवडेकर (वय ४६), सुधीर लक्ष्मण बोटे (वय २९, दोघेही रा. हसूर बुद्रुक, ता. कागल), अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी काम पाहिले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, केरबा बोटे व आरोपी सात्तापा नरतवडेकर यांची शेतजमीन एकमेकांच्या शेजारी आहे. दि.१४ एप्रिल २०१४ रोजी केरबा बोटे व त्यांची पत्नी छाया बोटे हे दोघे शेतात गेले होते. त्यावेळी सात्तापा नरतवडेकर हा ट्रॅक्टरने शेतात सपाटीकरण करत होता. यावेळी त्याच्या शेतातील माती ही शेजारील बोटे यांच्या शेतात परसली होती. त्यावेळी आमच्या शेतात पसरत असलेली तुमची माती काढून घ्या; अन्यथा ती आम्ही आमच्या शेतात विसकटून टाकू, असे छाया बोटे यांनी साताप्पाचा दत्तक भाऊ सुधीर बोटे याला सांगितले. त्यावरून सुधीर याने छाया यांना मातीचे ढेकूळ व दगड मारले. त्यामुळे केरबा व पत्नी छाया शेतातून गावाकडे पायी निघाले. त्यावेळी सुधीर व सात्तापा यांनी केरबा व छाया बोटे यांना रस्त्यात अडवून काठीने मारहाण केली. हल्ल्यात केरबा गंभीर जखमी झाले. गावातील लोक जमल्यावर दोघे हल्लेखोर पसार झाले. लोकांनी जखमींना गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दि.१५ एप्रिलला उपचारादरम्यान केरबा बोटे यांचा मृत्यू झाला. छाया बोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सात्तापा नरतवडेकर व सुधीर बोटे यांच्यावर मुरगूड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला.
न्यायालयात खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची साक्ष, तोंडी पुरावे व सरकारी वकील मंजूषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून सात्तापा नरतवडेकर व सुधीर बोटे यांना आजन्म कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून मारुती नाईक यांनी काम पाहिले.
फोटो नं.०१०४२०२१-कोल- सात्तापा नरतवडेकर (आरोपी-कोर्ट)
फोटो नं.०१०४२०२१-कोल- सुधीर बोटे (आरोपी-कोर्ट)
===Photopath===
010421\01kol_6_01042021_5.jpg~010421\01kol_7_01042021_5.jpg
===Caption===
फोटो नं.०१०४२०२१-कोल- सात्तापा नरतवडेकर (आरोपी-कोर्ट)फोटो नं.०१०४२०२१-कोल- सुधीर बोटे (आरोपी-कोर्ट)~फोटो नं.०१०४२०२१-कोल- सात्तापा नरतवडेकर (आरोपी-कोर्ट)फोटो नं.०१०४२०२१-कोल- सुधीर बोटे (आरोपी-कोर्ट)