शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

वाशीतील दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 6:26 PM

Crimenews, Court, police, kolhapurnews वाशी (ता. करवीर) येथे कार्यक्रमात जेवणानंतर परंपरेनुसार भांडी घासण्याच्या भाऊबंदकीतील वादातून चुलतभावाचे डोके झाडाच्या कठड्यावर (पारावर) आपटून खून केल्याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देचुलतभावाचा खून : दोन वर्षांनी निकालजेवणातील भांडी धुण्यावरून वाद उफाळला

कोल्हापूर : वाशी (ता. करवीर) येथे कार्यक्रमात जेवणानंतर परंपरेनुसार भांडी घासण्याच्या भाऊबंदकीतील वादातून चुलतभावाचे डोके झाडाच्या कठड्यावर (पारावर) आपटून खून केल्याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

महादेव मंगेश पुजारी (वय ४४) व अशोक मंगेश पुजारी (४७, दोघेही रा. वाशी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत, तर आण्णाप्पा आप्पाजी पुजारी (४७) असे मृताचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. गुडघे यांनी गुरुवारी ही शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी काम पाहिले.खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, दि. ११ मार्च २०१८ रोजी वाशी (ता. करवीर) येथे बिरदेव मंदिरसमोरील मोकळ्या जागेत पुजारी यांच्या भावकीचा एकत्र जेवणाचा कार्यक्रम होता. समाजाच्या परंपरेनुसार कार्यक्रमानंतर भावकीतील लोकांनी भांडी घासावी लागतात.

घटनेदिवशी रात्री आण्णाप्पा पुजारी हे भांडी घासण्यासाठी जाताना त्यांना मंगेश व महादेव पुजारी यांनी विरोध केला. त्यावरून आरोपी व मृत आण्णाप्पा यांच्यात वादावादी झाली. आरोपींनी आण्णापा यांना पकडून त्यांचे डोके झाडाभोवती सिमेंट-काँक्रीटच्या कठड्यावर (पारावर) जोरजोराने आपटले. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे आण्णाप्पा यांच्या मेंदूस दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. भाऊ नानासाहेब पुजारी यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंदविला.खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासले. नानासाहेब पुजारी, सखाराम इराप्पा पुजारी व संजय बाबू काटकर या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. साक्षीदारांचा महत्त्वपूर्ण जबाब व सरकारी वकील ॲड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींना आजन्म कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांना करवीर पोलीस ठाण्याचे हवलादार महेश वाडकर, पोलीस नाईक एम. एम. नाईक यांनी मदत केली. 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर