कोल्हापूर : भीमा-कृष्णा खोऱ्यात गेल्या वर्षी आलेल्या अभूतपूर्व आणि विनाशकारी महापुराचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या वडनेरेपूर अभ्यास समितीतच फूट पडली आहे. सदस्य असलेले ज्येष्ठ जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे राजीनामा देऊन बाहेर पडले आहेत. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी त्यास दुजोरा दिला.सरकारकडे सादर केलेल्या या अहवालात अभ्यास समितीचा मसुदाच अंतिम अहवालातून गायब झाल्याचा आक्षेप घेत त्यांनी बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. नऊ महिन्यांपूर्वी नेमलेल्या या समितीचा आता अंतिम अहवाल तयार झाला होता, यात बदल कुणी आणि कशासाठी केला, असा नवीनच प्रश्न चर्चेत आला आहे. संभाव्य महापुराच्या नियोेजनाऐवजी आता या समितीवर असलेला दबावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.कृष्णा व भीमा खोºयात आॅगस्टमध्ये आलेल्या पूर परिस्थितीचा अभ्यास करण्यÞासाठी शासनाने २३ आॅगस्ट २०१९ रोजी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समितीची नियुक्ती केली. प्रदीप पुरंदरे १४ मे रोजी समितीतून बाहेर पडले. या पूर-अभ्यÞास-समितीतून ते अचानक बाहेर का पडले, याचा सविस्तर तपशील त्यांनी स्वत:च निवेदनातून दिल्याने या चर्चेला तोंड फुटले आहे.समितीच्या अहवालाचा मसुदा १२ मे रोजी ई-मेलने समिती-सदस्यांना पाठवण्यात आला आणि १४ मे च्या झूम बैठकीत तो अंतिम करायचा आहे, असे कळवण्यात आले. तो अहवाल पाहिल्यावर मला धक्काच बसला. कारण त्यात पूररेषानिहाय विभाग हे प्रकरण आणि कोयना प्रकल्पाचा सुधारित आरओएस या दोहोंचाही समावेश नव्हता. - प्रदीप पुरंदरे, जलतज्ञ
महापूर अहवालातील मसुद्यातून दोन प्रकरणे गायब, अहवाल बदलण्यावरून वडनेरे समितीत फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 3:34 AM