शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

शंभर कोटींसाठी दोन कोटींची सुपारी

By admin | Published: June 19, 2014 1:11 AM

अतिक्रमणे नियमितीसाठी खेळी : महापालिकेत चर्चा; एका बाजूला विरोध, दुसरीकडे तोडपाणीच्या हालचाली

संतोष पाटील ल्ल कोल्हापूरमहापालिकेच्या कचरा डेपोसाठी तावडे हॉटेलजवळील आरक्षित जागेवर, तसेच गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या स्वमालकीच्या जागेवर अतिक्रमणे झाली. न्यायालयाचा दणका व प्रसारमाध्यमांचा पाठपुरावा यामुळे महापालिकेने कारवाईचा धडाका लावला. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही १०० कोटींच्या मिळकतीसाठी दोन कोटींची ‘सुपारी’ फुटल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.महापालिकेच्या नावांवर सन १९४५ पासून येथील क ाही मिळकती असूनही उचगाव ग्रामपंचायतीने यावर बेकायदेशीर बांधकामांना परवानगी दिली आहे. जिल्हा न्यायालयाने ही सर्व जागा महापालिकेच्या हद्दीत असल्याचा निकाल दिल्याने बेकायदेशीर बांधकामांवर शिक्कामोर्तब झाले. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांनुसार हा अदखलपात्र गुन्हाच ठरणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर अतिक्रमण कारवाईबरोबरच ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकाबाजूला आवाज उठवायचा व दुसऱ्या बाजूला तोडपाणीच्या हालचालीही करण्याची खेळी अनेकजण करत आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माजी नगरसेवक संघटनेने अतिक्रमणांची सर्व कागदपत्रे दाखवली होती. कचरा डेपोच्या जागेवरच टोलेजंग इमारती उभारल्याचे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. इतका सगळा घोळ सुरू असताना महापालिकेचे अधिकारी झोपा काढत होते का? असा सवालही पवार यांनी त्यावेळी उपस्थित केला होता. इतके होवूनही ३८ मिळकती वगळण्याची खेळी करणारे महापालिकेचे अधिकारी अद्याप झोपलेलेच असल्याची सद्य:परिस्थिती दर्शवते.शासन मंजूर विकास योजनेनुसार मौजे उचगावचे रि.स.नं. ८४, ८७, ९१ ते ९७, १०० ते १०३, ११८ ते १२०, १२२ ते १२५, १३४, १३८, १३७, १४३ या जमिनी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत आहेत. उचगाव ते तावडे हॉटेलदरम्यान महापालिकेने कचरा डेपो व ट्रक टर्मिनससाठी आरक्षित केलेल्या ३८ जागांवर १०० कोटींची अवैध बांधकामे सुरू आहेत. हा सर्व प्रकार नगररचना विभागाच्या मेहरबानीमुळेच सुरू असल्याचा आरोप जाहीररित्या करण्यात आला होता. आता या मिळकती वाचविण्यासाठी सुपारी फुटल्याची चर्चा आहे. (क्रमश:)