२४१२२०२०-आयसीएच-०१ (कौसार अत्तार)
२४१२२०२०-आयसीएच-०२ (अक्षय नलवडे)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील कौसार अत्तार हिची अमेरिका येथील कॉंकॉर्डी युनिव्हर्सिटीमध्ये, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील अक्षय नलवडे याची टेक्निशे होशुले रोझेनहेम (जर्मनी) या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे.
कौसार अत्तार हिने इटीसी विभागातून पदवी घेतली असून, कॉँकॉर्डी या युनिव्हर्सिटीच्या इलेक्ट्रिकल अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातून मास्टर ऑफ इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळविला आहे. तिला न्यूरल नेटवर्क, प्रोग्रॅमिंग ऑन क्लाऊड, सायबर सिस्टीम, प्रोटोकॉल डिझाईन अशा विविध तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीप्राप्त अक्षय नलवडे याची टेक्निशे होशुले रोझेनहेम जर्मनी या विद्यापीठामध्ये मेकॅनिकल अॅण्ड प्लास्टिक इंजिनिअरिंग इन मास्टर्स प्रोग्रॅम इन इंजिनिअरिंग सायन्ससाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सचिव सपना आवाडे, आर. व्ही. केतकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डॉ. यु. जे. पाटील, प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांचे मार्गदर्शन लाभले.